व्यापारी भवन लोकार्पण कार्यक्रमात आमदारांनी केला भविष्यातील विकासाचा संकल्प !
साईमत/पाचोरा/प्रतिनिधी :
वैशालीताईची बुध्दी अद्यापही लहान असून ती राजकारणात ‘अपरिपक्व’ आहे. ‘तात्या’ त्यांचे वडील असले तरी ‘तात्या’ माझा राजकारणातील बाप आहे. बॅनरवरुन फोटो निघाले तरी ‘तात्या’ माझ्या हृदयात कायम आहेत. त्यांच्या नावाचा फोटोचा वापर करणार नाही. मात्र, त्यांच्या नावाने असलेल्या व्यापारी भवनात सर्व ठिकाणी त्यांचे फोटो स्वखर्चातून लावणार आहे. सोबतच व्यापारी बांधवानी केलेल्या मागणीनुसार टेरेसवर योगा, व्यायाम करण्याची आणि पत्रकारांसाठी बसण्याची व्यवस्था करणार असल्याची ग्वाही आ.किशोर पाटील यांनी दिली. पाचोरा नगरपरिषद अंतर्गत शहरातील भडगाव रोड, बाजार समितीच्या समोर पाच कोटी रुपये खर्चून बांधलेल्या कृषिरत्न माजी आमदार कै.तात्यासाहेब आर.ओ.पाटील व्यापारी भवनाचा आ.किशोर पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी, ३० ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्यापारी पूनम मोर होते.
याप्रसंगी मुख्याधिकारी मंगेश देवरे, शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर उपजिल्हा, माजी नगराध्यक्ष शांताराम पाटील, संजय गोहिल, विष्णू सोनार, उपनगराध्यक्ष शरद पाटे, बंडू चौधरी, नासिर बागवान, बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, मनोज शिसोदिया, युसुफ पटेल, माजी संचालक सुभाष अग्रवाल, संजय शिसोदिया, माजी नगरसेवक शितल सोमवंशी, राम केसवाणी, अयुब बागवान, बापू हटकर, गंगाराम पाटील, व्यापारी आघाडीचे कांतीलाल जैन, रवि केसवाणी, पिपल्स बँकेचे संचालक प्रशांत अग्रवाल, जीवन जैन, जिनिंग असो.चे अध्यक्ष प्रमोद सोनार, किराणा असो.चे अध्यक्ष जगदीश पटवारी, कृषि सेवाचे केंद्राध्यक्ष राजु बोथरा, शेतकी संघाचे व्हा. चेअरमन नंदू पाटील, भाजीपाला असो.चे राजेंद्र बडगुजर, संजय चौधरी, मेडिकल असो.चे जितेंद्र जैन, सराफ असो.चे नंदकुमार सोनार, स्विय सहाय्यक राजेश पाटील, नितीन चौधरी, संदीप राजे, बाजार समितीचे सचिव बी.बी.बोरुडे, लिपिक वसंत पाटील यांच्यासह विविध व्यापारी, व्यावसायिक, नगर पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
सिंचन क्षेत्रात ‘आप्पांचे’ नाव निघेल
प्रास्ताविकात मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी व्यापारी भवन निर्मितीसाठी आमदारांनी केलेला पाठपुरावा आणि या भवनाच्या उपयुक्तताबाबत मत व्यक्त केले. माजी नगराध्यक्ष विष्णू सोनार यांनी आमदारांच्या हातून सुरू असलेल्या विकासाबाबत आणि के. एम.बापू पाटील यांच्यानंतर किशोर आप्पा यांचे नाव सिंचन क्षेत्रात निघेल, असे कौतुक केले.
मतदार संघ ‘सुजलाम् सुफलाम्’ करण्यासाठी कटीबध्द
कै.आमदार आर.ओ.तात्यांचे व्यापारी भवन निर्मितीचे स्वप्न पूर्ण केले आहे. पाटील व्यापारी हा घटक कधीही काहीही मागत नसला तरी त्यांच्या सहकार्याने ही वास्तू उभारू शकलो. मागील पंधरा वर्षांत शहराच्या विकासाची परिस्थिती जनतेने पाहिली आहे, आणि सद्यस्थितीला मतदारसंघात सर्व पातळीवर सुरू असलेला सर्वांगिण विकास जनता बघत आहे. आगामी काळात शहर व ग्रामीण भागात जनतेच्या मूलभूत सोई, सुविधा मूलभूत गरजा, १०० टक्के शुद्ध पाणीपुरवठा, शेतरस्ते, आवश्यक ठिकाणी के.टी. वेअर, हिवरा नदीवर पुलांची कामे, भविष्यात के. टी. वेअर, रोजगानिर्मितीसाठी सूतगिरणीला चालना, चार महिन्यांच्या आत भडगाव रोड भगातील सर्व रस्ते काँक्रिटीकरण, जॉगिंग ट्रॅक, ऑक्सिजन पार्क, काकण बर्डी परिसरात सुसज्ज अद्यावत क्रीडा संकुल, सामाजिक वनीकरण, लहान मोठ्या व्यापार व्यावसायिकांसाठी व्यापारी संकुलात गाळे उपलब्धता यासोबतच मतदार संघातील शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाटचाऱ्याबाबत आराखडा केला आहे. माझा मतदार संघ ‘सुजलाम् सुफलाम्’ करण्यासाठी कटीबध्द असल्याचेही आ.किशोर पाटील यांनी सांगितले.
आगामी काळातील विकासाचा संकल्प आमदारांनी भाषणातून व्यक्त केला. सूत्रसंचालन तथा आभार प्रवीण ब्राह्मणे यांनी मानले.