Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्पासह दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लाभ द्यावा
    कृषी

    गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्पासह दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना लाभ द्यावा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMarch 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊनही शेतकऱ्यांना दुष्काळाच्या कवडीचाही फायदा झालेला नाही. मन्याड धरणाच्या पाण्यावर शेतकरी अवलंबून आहे. त्यामुळेे गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून गिरणा धरणातून मन्याड धरणात पाणी टाकून शेतकऱ्यांना शेतीसाठी व गुरांच्या पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मन्याड धरण परिसरातील शेतकऱ्यांनी चाळीसगावच्या तहसिलदारांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास शिरसगाव येथील शेतकरी दिलीप पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

    शासनाने दुष्काळाच्या सर्व सुविधा शेतकऱ्यांना देण्यात याव्यात तर मन्याड धरण्याच्या पाण्यावर शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मन्याड धरण परिसरात पर्जन्यमान चांगले होत नसल्यामुळे मन्याड धरण भरत नसल्यामुळे गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करावा, गिरणा धरण पावसाळ्यात भरल्यानंतर अतिरिक्त पाणी मण्याड धरणात टाकल्यास पाण्यापासून वंचित असलेले मन्याड धरण परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्‍न सुटेल आणि शेती पिकांना आणि गुरेढोरांना पाण्याची सुविधा उपलब्ध होईल. तसेच मन्याड धरणाची उंची वाढवून कॅनॉलची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास वीज पुरवठा सुरळीतपणे करावा. तसेच गिरणा धरणातून मन्याड धरणात पाणी टाकण्याची मागणी मन्याड धरण परिसरातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास शिरसगाव येथील शेतकरी दिलीप फकीरा पाटील हे ८ मार्च २०२४ पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.

    निवेदनावर दिलीप पाटील, मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा संपर्क खुशाल बिडे, चंद्रकांत पाटील, धर्मा काळे, जयेश पाटील, साहेबराव चव्हाण, भूषण पाटील, गुलाब चव्हाण, आनंदा चव्हाण, रवींद्र पाटील, आशिष सानप, जयदीप पवार, संजय पाटील, दिनकर पाटील, सागर पाटील, देवचंद पाटील, सुवर्णसिंग पाटील, रावण पाटील, खुशाल पाटील, रमेश पाटील, विकास पाटील, पिराजी गायकवाड, लहू बिलोरे, सफिक शेख, रवींद्र पाटील, रयत सेनेचे छोटु अहिरे, स्वप्नील गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    देशात पुरेसा एलपीजी साठा; अफवांकडे न जा, सरकारचा संदेश

    March 25, 2026

    Chalisgaon : चाळीसगावात भररस्त्यावर मुलीची छेडछाड

    March 25, 2026

    Chalisgaon : करगाव रस्त्यावरील रेल्वे बोगदे बंद; पाहणी नंतर लवकरच सुरू होणार, नव्या अंडरपासाचीही तयारी

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.