National Banana Research Advisor : राष्ट्रीय केळी संशोधन सल्लागारपदी डॉ.के.बी.पाटील

0
12

जैन इरिगेशनचे जागतिक केळी तज्ज्ञ म्हणून ओळख

साईमत/जळगाव/प्रतिनिधी

जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ तथा उपाध्यक्ष डाॅ. के.बी. पाटील यांची राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिचीच्या (तिरुचिरापल्ली) संशोधन सल्लागार समितीवर केंद्र सरकारने निवड केली आहे. ही निवड पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे. त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा केळीच्या संशोधनाला दिशा देण्यासाठी होणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी अभिनंदन केले आहे.

गेल्या तीस वर्षापासून डॉ. के. बी. पाटील हे केळी पिकाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. केळी उत्पादन तंत्रज्ञानावर अनेक प्रकारचे संशोधन करून जैन टिश्यूकल्चरच्या माध्यमातून केळी पिकात क्रांती केली आहे. केळीची काढणी पूर्व व काढणी पश्चात हाताळणी आणि निर्यात यासाठी तीस वर्षे काम करून केळीची निर्यात वाढविली. केळीसाठी गादी वाफा, मल्चिंग, फाॅस्फोरीक ॲसिडचा वापर, वर्षभर केळीसाठी फर्टिगेशनचे तंत्रज्ञान केळीसाठी २०० ग्रॅम नत्र, ७० ग्रॅम स्फूरद व ४०० ग्रॅम पालाश प्रति झाड, फ्रुट केअर पद्धती असे अनेक तंत्रज्ञान देशात त्यांनी प्रथमच विकसित केले. जैन टिश्यूकल्चर ग्रॅडनैन या विदेशी जातीला संपूर्ण देशात लोकप्रिय करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

केळी पिकाचा प्रचंड अभ्यास

जगातील सर्व प्रमुख केळी उत्पादक देशांना भेटी दिलेल्या आहे. त्यामुळे त्यांचा सखोल अभ्यास झालेला आहे. केळीबाबतचे अत्याधुनिक तंत्रज्ञान तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले. केळी पिकाचा प्रचंड अभ्यास व अनुभव अधोरेखीत करत भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी डाॅ. के.बी. पाटील यांची संशोधन सल्लागार समितीवर निवड केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here