साईमत, जामनेर : प्रतिनिधी
जालना येथील सकल मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर अमानुषपणे पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी सकल मराठा समाजाचे अनेक बांधव व भगिनी गंभीररित्या जखमी झाले होते. या घटनेचा निषेध म्हणून आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन म्हणून तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागण्या मान्य व्हाव्या, यासाठी संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष विकास पाटील हे जामनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या बांधवांसह एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास तहसील कार्यालयासमोर बसले होते. उपोषणाची सांगता जामनेर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या हस्ते विकास पाटील यांना शरबत पाजून करण्यात आली.
यावेळी डॉ.प्रशांत पाटील, प्रदीप गायके, अशपाक पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उपोषणास विविध संघटनेच्या माध्यमातून पाठिंबा देण्यात आला. त्यात रिपब्लिक पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष अण्णा तायडे, प्रदीप गायके, मनोज महाले, नरेंद्र जंजाळ, जीवन सपकाळ, व्ही.पी.पाटील, किशोर पाटील, किरण पाटील, प्रल्हाद बोरसे, अशोक पाटील, अरविंद तायडे, प्रभू झाल्टे, भगवान पाटील, राजू सुरवाडे, दला नेरकर, प्रवीण गावंडे यांच्यासह असंख्य समाज बांधवांनी उपोषणास हजेरी लावत पाठिंबा दिला.