फटाका कारखान्यात स्फोट : गोविंद शिरोळेiसह कुटुंबातील तिघांना दहा वर्षांची शिक्षा पारोळा (प्रतिनिधी ) फटाका कारखान्यात स्फोट होऊन २४ कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या खटल्यात माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघांना न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा सुनावल्याने खळबळ उडाली आहे. पारोळा येथील फटाका कारखान्यात स्फोट होऊन होरपळून २४ कामगारांचा मृत्यू झाला होता. १० एप्रिल २००९ रोजी ही भीषण घटना घडली होती. कारखान्याचे मालक तथा माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, चंद्रकांत शिरोळे व त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा मनीषा शिरोळे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमळनेर न्यायालयात हा खटला चालला होता. ४२ पैकी ३८ साक्षीदार फितूर झाले होते.…
Author: Vikas Patil
हतनूरमध्ये यंदा तीन टक्के जलसाठ्यात घट जळगाव (प्रतिनिधी ) जळगाव जिल्ह्यात एप्रिलमध्येच तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या हतनूर धरणात तर गतवर्षी 47.6 टक्के होता. मात्र यावर्षी हातनूर धरणात फक्त 44.78 टक्के जलसाठा शिल्लक आहे. म्हणजेच हतनूरमध्ये यंदा सुमारे तीन टक्के जलसाठ्यात घट झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील अंमळनेर, भडगाव, जामनेर व चाळीसगाव या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. या चार तालुक्यांतील सात गावांमध्ये आठ पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत. पाणीटंचाईमुळे विहिरींच्या अधिग्रहणालाही गती देण्यात आली असून, एरंडोल तालुक्यात 1, मुक्ताईनगरमध्ये 4, पाचोरामध्ये 4, चाळीसगावमध्ये 4 आणि अंमळनेर तालुक्यात 8 अशा…
आगामी दोन दिवस जिल्ह्यात उष्णतेचा अलर्ट जळगाव (प्रतिनिधी ) राज्यात काही ठिकाणी तापमान वाढीने कहर केला आहे तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे. जळगाव जिल्ह्यातही २७ व २८ पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे पावसाची शक्यता मावळली आणि तापमानात वाढ झाली. दरम्यान जिल्ह्यात उष्णतेचा अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. वातावरणात झालेल्या बदलांमुळे २७ व २८ एप्रिल रोजी जिल्ह्यात ओल्या हवेचा प्रवाह अपेक्षेपेक्षा ३० टक्के कमी आला. तसेच वाऱ्याची दिशा बदलली. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ढग वेगळे झाले. या कारणांमुळे जिल्ह्यात कुठेही पाऊस झाला नाही. दुसरीकडे सोमवारी तापमान ४१.५ अंशांवर…
उन्हाने केळी बागांची होरपळ; घड सटकण्याची समस्या जळगाव (प्रतिनिधी ) जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून एप्रिल महिन्यातच ‘मे हिट’ सारखा तडाखा जाणवत आहे. वाढत्या उष्णतेचा केळी बागांनाही मोठा फटका बसत आहे. केळीच्या बागा होरपळल्या जात असून, केळीची पाने पिवळी पडत आहेत. केळीचे घड सटकण्याची समस्या तयार झाली आहे. रावेर, यावल, चोपडा, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड होते. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे केळीचे लागवड क्षेत्रही वाढले आहे. केळीच्या चांगल्या उत्पादनासाठी १२ ते ४० अंशांदरम्यानचे तापमान पोषक मानले जाते. शेतकऱ्यांनी उष्णतेपासून बागांच्या बचावासाठी हिरवी नेट किंवा नैसर्गिक वारा अवरोधक म्हणून शेवरी, संकरित गवताची लागवड केली आहे. काही अंशी…
विहीर अनुदानात लुबाडणूक; आ. चव्हाण यांच्या पुढाकाराने गुन्हे दाखल चाळीसगाव ( प्रतिनिधी ) मनरेगा योजनेतून शेतकऱ्यांना विहिरी खोदण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते. काम पूर्ण होण्याच्या टप्प्यानुसार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाते. मात्र, यात तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होताच आ. मंगेश चव्हाण यांनी थेट शहर पोलिस ठाण्यात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदविल्या आहेत. २८ एप्रिलरोजी दुपारी आ. चव्हाण यांना शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विहिरी मंजूर झाल्यानंतर खात्यावर रक्कम जमा होण्यासाठी कमिशन द्यावे लागते. हे कळताच आ.चव्हाण यांनी लुबाडणूक झालेल्या शेतकऱ्यांसमोर पंचायत समितीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत थेट शहर पोलिस…
अपघातात पिता-पुत्राचा जागीच मृत्यू सावदा (प्रतिनिधी)- रावेर तालुक्यातील खिरोदा–पाल घाटात २७ रोजी रात्री चारचाकी मालवाहू वाहनाने (एमएच २८ – १३१४) दुचाकीला (एमपी ०९ एक्स ७७७९) धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, आई आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाला. पिंट्या भिलाला (वय ३५) आणि त्यांचा ४ वर्षांचा चिमुकला रितिका भिलाला, (रा. पाल, ता. रावेर) यांचा या अपघातात अंत झाला. पिंट्या यांची पत्नी पूजा (वय ३०) आणि त्यांचा २ वर्षांचा मुलगा रोशन यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन महिलांना जाळ्यात ओढत आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल जळगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील एका गावामध्ये दोन महिलांना प्रेमाचे आमिष दाखवून त्यांना व्हिडिओ कॉल करीत त्यांचे नग्न व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि समाजमाध्यमावर व्हायरल केले. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावामध्ये २५ एप्रिल रोजी पूर्वी संशयित श्रीकृष्ण चिखलकर याने ३६ वर्षीय फिर्यादी महिलेला दबाव टाकून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला फोनवर व्हिडिओ कॉल करून तिला विवस्त्र होण्यास सांगून व्हिडिओ रेकॉर्ड केला.आणखी एका तरुणीला देखील प्रेमाच्या जाळ्यात ओढून दबाव टाकत विवस्त्र व्हिडिओ बनवला. हे व्हिडिओ समाजमाध्यमांवर आरोपीने व्हायरल केले आहे. याबाबत कळताच ३६ वर्षीय फिर्यादी महिलेने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तक्रार…
रेशनकार्डसाठी दलालांमुळे भूर्दंड, धान्य दुकानांमध्ये काळाबाजार यावल (प्रतिनिधी)- तहसील कार्यालयात रेशनकार्डसाठी सामान्यांना दलालांमुळे भुर्दंड सोसावा लागत आहे. मोफत मिळणारे रेशनकार्डसाठी दोन हजार रुपये घेतले जात आहेत. स्वस्त धान्य दुकानदार मिळालेल्या धान्यापैकी निम्मे धान्य साठवून काळ्या बाजारात विकत असल्याच्या गंभीर तक्रारी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी सेवा हक्क दिनानिमित्त झालेल्या आढावा बैठकीत मांडल्या. पंचायत समितीच्या सभागृहात या बैठकीत आमदार सोनवणे यांनी अध्यक्षस्थानावरून तहसीलच्या पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “रेशनकार्ड लाभार्थ्यांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. पिवळे रेशनकार्ड अनेक श्रीमंत लोकांकडे आहेत. ती रद्द करावीत. तहसील कार्यालयात दलालांमार्फत होणारी लूट थांबवावी आमदार सोनवणे यांनी स्वस्त धान्य दुकानदारांकडून होणाऱ्या काळ्या…
जळगावात ‘आखाजी पहाट’चे आयोजन जळगाव (प्रतिनिधी ) आखाजीच्या आगमनाची अनोखी सुरुवात करण्यासाठी परिवर्तन जळगावतर्फे ‘आखाजी पहाट’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन ३० एप्रिलरोजी सकाळी ६ वाजता भाऊंचे उद्यान येथे केले आहे. खानदेशातील कृषी संस्कृती आणि लोकपरंपरांशी घट्ट नाळ जोडलेला हा सण हजारो वर्षांपासून उत्साहात साजरा केला जातो. परिवर्तन जळगाव नेहमीच खानदेशातील संस्कृती, साहित्य आणि लोककला महाराष्ट्राच्या समोर आणण्यासाठी प्रयत्न करत असते. संस्थेने यावर्षी ‘आखाजी पहाट’ या नवीन कार्यक्रमाची संकल्पना साकारली आहे. अक्षय तृतीयेचे महत्त्व वेगळे असले तरी, खानदेशात आखाजी आजही मोठा सण मानला जातो. या कार्यक्रमाची संकल्पना सुनील बारी यांची असून मंजुषा भिडे आणि नारायण बाविस्कर यांनी दिग्दर्शन केले आहे. निर्मिती…
बिबट्याच्या हल्ल्याततील मृत बालकांच्या कुटुंबांना मदत यावल (प्रतिनिधी) मनवेल आणि डांभुर्णीत बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या दोन चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये अशा ५० लाख रुपयांचे धनादेश आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सेवा हक्क दिनानिमित्त यावल पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत या मदतीचे वितरण करण्यात आले. या बैठकीत आमदार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे), गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी जहॉंगीर तडवी, वनपाल विपुल पाटील यांची प्रउपस्थिती होती. मनवेल येथे ६ मार्च रोजी बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय…