दोन महिलांना जाळ्यात ओढत आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल
जळगाव (प्रतिनिधी)-
तालुक्यातील एका गावामध्ये दोन महिलांना प्रेमाचे आमिष दाखवून त्यांना व्हिडिओ कॉल करीत त्यांचे नग्न व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि समाजमाध्यमावर व्हायरल केले. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावामध्ये २५ एप्रिल रोजी पूर्वी संशयित श्रीकृष्ण चिखलकर याने ३६ वर्षीय फिर्यादी महिलेला दबाव टाकून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला फोनवर व्हिडिओ कॉल करून तिला विवस्त्र होण्यास सांगून व्हिडिओ रेकॉर्ड केला.आणखी एका तरुणीला देखील प्रेमाच्या जाळ्यात ओढून दबाव टाकत विवस्त्र व्हिडिओ बनवला. हे व्हिडिओ समाजमाध्यमांवर आरोपीने व्हायरल केले आहे. याबाबत कळताच ३६ वर्षीय फिर्यादी महिलेने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.