Help for families : बिबट्याच्या हल्ल्याततील मृत बालकांच्या कुटुंबांना मदत

0
16

बिबट्याच्या हल्ल्याततील मृत बालकांच्या कुटुंबांना मदत

यावल (प्रतिनिधी)

मनवेल आणि डांभुर्णीत बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या दोन चिमुकल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपये अशा ५० लाख रुपयांचे धनादेश आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

सेवा हक्क दिनानिमित्त यावल पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत या मदतीचे वितरण करण्यात आले. या बैठकीत आमदार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली.

यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे), गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी जहॉंगीर तडवी, वनपाल विपुल पाटील यांची प्रउपस्थिती होती.

मनवेल येथे ६ मार्च रोजी बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय केशव बारेला या बालकाचा मृत्यू झाला होता. डांभुर्णीच्या शिवारात १५ एप्रिलरोजी मेंढीपालन करणाऱ्या ठेलारी कुटुंबातील २ वर्षीय रत्नाबाईचा बळी बिबट्याने घेतला होता.

या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत तातडीने उपलब्ध व्हावी यासाठी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख रुपये इतकी मदत त्यांच्या हाती देण्यात आली. यावेळी आमदार सोनवणे यांनी त्यांच्या मदतीसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here