अपघातात पिता-पुत्राचा जागीच मृत्यू
सावदा (प्रतिनिधी)-
रावेर तालुक्यातील खिरोदा–पाल घाटात २७ रोजी रात्री चारचाकी मालवाहू वाहनाने (एमएच २८ – १३१४) दुचाकीला (एमपी ०९ एक्स ७७७९) धडक दिल्याने अपघात झाला. या घटनेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, आई आणि लहान मुलगा गंभीर जखमी झाला.
पिंट्या भिलाला (वय ३५) आणि त्यांचा ४ वर्षांचा चिमुकला रितिका भिलाला, (रा. पाल, ता. रावेर) यांचा या अपघातात अंत झाला. पिंट्या यांची पत्नी पूजा (वय ३०) आणि त्यांचा २ वर्षांचा मुलगा रोशन यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.