राज्य शिक्षण मंडळाचे अस्तित्व कायम; दादा भुसे यांची ग्वाही नाशिक (प्रतिनिधी)– राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांत आगामी शैक्षणिक वर्षापासून केवळ इयत्ता पहिलीसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) अभ्यासक्रम लागू केला जाणार आहे. बालभारती आणि राज्य माध्यमिक शालेय प्रमाणपत्र मंडळाचे अस्तित्व कायम राहील, अशी ग्वाही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी येथे दिली. सीबीएसई अभ्यासक्रमाविषयी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमधील गैरसमज सभागृहात आणि पत्रकार परिषदेत दूर केले जाणार असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. काहींना बालभारती आणि राज्य माध्यमिक शालेय प्रमाणपत्र मंडळाच्या (एसएससी बोर्ड) अस्तित्वाविषयी संभ्रम वाटतो. परंतु, त्यांचे अस्तित्व कायम राहणार आहे. माहिती मांडल्यानंतर सर्वांचे गैरसमज दूर होऊन या निर्णयाचे स्वागत होईल, असा विश्वास त्यांनी…
Author: Vikas Patil
‘बदन पे सितारे लपेटे हुए…’ ; मंत्री सावकारेंच्या मनात नेमके कोण? जळगाव (प्रतिनिधी)- राजकारणाचा व्याप सांभाळून खास गाणे म्हणण्याचा छंद वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही जोपासला आहे. संधी मिळेल तेव्हा पदाचा बडेजाव न मिरवता सहजपणे गाणाऱ्या मंत्री सावकारे यांनी रविवारी भुसावळमध्ये कार्यक्रमात ‘बदन पे सितारे लपेटे हुए…’ हे गाणे गायिले. या गाण्यानंतर मंत्री सावकारे यांच्या मनातील ती कोण, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली. भुसावळमधील स्नेहयात्री प्रतिष्ठानकडून स्नेहयात्री करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदा समारोपप्रसंगी उपस्थित मंत्री संजय सावकारे यांना गाणे म्हणण्याचा आग्रह झाला. तेव्हा फार आढेवेढे न घेता कराओकेच्या मदतीने त्यांनी ‘बदन पे सितारे लपेटे हुए…’ हे शम्मी कपूर…
गर्दी नसल्याने ओबीसी मेळाव्यात भुजबळांसमोर पदाधिकाऱ्यांची आगपाखड जळगाव ( प्रतिनिधी)- मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने जाहीर नाराजी व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते छगन भुजबळ यांनी अलिकडे पक्ष नेतृत्वाविरोधात मवाळ भूमिका घेतली आहे. मात्र, समता परिषदेकडून ओबीसींचे मेळावे घेऊन प्रभाव पुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. जळगावमधील मेळाव्यातूनही भुजबळांनी शक्तिप्रदर्शन केले. परंतु, मेळाव्यास अपेक्षेपेक्षा कमी गर्दी जमल्याने भुजबळांसमोरच पदाधिकाऱ्यांनी आगपाखड केली. मेळाव्यात भुजबळ यांनी केलेल्या मार्गदर्शनापेक्षा ही आगपाखडच चर्चेत राहिली. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे शनिवारी शहरात ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. छगन भुजबळ उपस्थित होते. मेळाव्याच्या ठिकाणी वैयक्तिक भुजबळांच्या प्रभावामुळे जिल्हाभरातून गर्दी अपेक्षित होती. उत्साहात आयोजकांनी आवश्यक…
संतोष देशमुखांच्या मुलाचे आमिरखानकडून सांत्वन पुणे ( प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ मध्ये हत्या झाली. त्यांना न्याय मिळावा अशी मागणी देशमुख कुटुंबीय करत आहेत. आता बॉलीवूड अभिनेता आमिर खानने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. अभिनेता आमिर खानने पुण्यात संतोष देशमुख यांच्या मुलाची भेट घेतली. आमिरने संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुखांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पुण्यात बालेवाडी स्टेडियम येथे पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमादरम्यान आमिर खाननं देशमुख कुटुंबीयांशी संवाद साधला. दरम्यान, संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर आरोपींच्या विकृतीचे फोटो समोर आले होते.…
युवक काँग्रेसची नवी कार्यकारिणी २ दिवसांत बरखास्त मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या युवक काँग्रेसमधील हालचालींमुळे खळबळ उडाली आहे. काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी घेतलेल्या निर्णयांची चर्चा होत आहे. त्यांनी नुकतीच 276 जणांची कार्यकारिणी जाहीर केली होती, मात्र अवघ्या 48 तासांतच राष्ट्रीय समितीने ही कार्यकारिणी रद्द केली. यामुळे काँग्रेस गोटात खळबळ उडाली आहे. कुणाल राऊत यांनी कुठलीही परवानगी न घेता तसेच आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता ही कार्यकारिणी घोषित केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यापूर्वी पदमुक्त करण्यात आलेले केतन ठाकरे यांना पुन्हा कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राष्ट्रीय सचिव अजय चिकारा, सहप्रभारी कुमार रोहित आणि एहसान अहमद…
समाजाशी बांधिलकी जोपासत प्रत्येकाला पुढे येण्याचे आ. एकनाथराव खडसे यांचे आवाहन लेवा पाटीदार समाज सामुहिक सोहळ्यात २३ विवाह जळगाव (प्रतिनिधी)- सध्या विवाहांमध्ये होणारा खर्च टाळणेसाठी सामुहिक विवाह सोहळा ही काळाची गरज बनली आहे. समाजाची बांधीलकी जोपासण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन योगदान दिले पाहिजे. वधूवरानी भविष्यात कुरबुरी न करता समजंसपणे संसार करावा, असे प्रतिपादन माजीमंत्री तथा विधानपरिषदेचे आ. एकनाथराव खडसे यांनी केले. लेवा एज्युकेशनल युनियन, अखिल भारतीय लेवा युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड यांचे संयुक्त विद्यमाने लेवा पाटीदार समाजातील वधु – वरांचा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन २३ मार्चरोजी सकाळी लेवा बोर्डीगचे प्रांगणात करण्यात आले. या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये २३ वधुवरांचा सहभाग होता.…
रोटरीच्या ‘धरोहर’ कार्यक्रमात माजी अध्यक्षांचा गौरव जळगाव (प्रतिनिधी)– शहरातील सर्वात पहिला व यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या रोटरी क्लब जळगावतर्फे स्थापनादिनानिमित्त क्लबच्या माजी अध्यक्षांचा परिवारासह ‘धरोहर’ या सोहळ्यात गौरव करण्यात आला. अध्यक्ष ॲड. सागर चित्रे व मानद सचिव पराग अग्रवाल यांनी माजी अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर सिकची, प्रेम कोगटा, प्रा. रमेश लाहोटी, प्रा.पुनम मानूधने, डॉ. प्रदीप जोशी, राघवेंद्र काबरा, डॉ. जयंत जहागीरदार, प्रकाश (बाबा) दप्तरी, ॲड. प्रवीणचंद्र जंगले, अशोक जोशी, डॉ. दीपक पाटील, नित्यानंद पाटील, कॅप्टन मोहन कुलकर्णी, जितेंद्र ढाके, संदीप शर्मा, राजेश वेद, मनोज जोशी या मान्यवरांचा स्मृतिचिन्हासह गौरव केला. माजी अध्यक्षांनी व जेष्ठ सदस्यांनी क्लबच्या ७५ वर्षांच्या वाटचालीला…
‘पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय’ खात्याचा आता नवा आकृतीबंध अतिरिक्त ठरणारे कर्मचारी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये जाणार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राज्य सरकार पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना व पदांचा सुधारित आकृतीबंध तयार करणार आहे. यामुळे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागात अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन नव्याने निर्माण होणाऱ्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समध्ये करण्यात येणार आहे हे आदेश गृह विभागाचे उपसचिव रा. ता. भालवणे यांनी काढले आहे राज्यातील पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे एकत्रीकरण अंतिम टप्प्यात असून यापुढे हे तीनही विभाग एकत्रित कार्यरत राहणार आहेत. केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.…
यंदा जि. प. शाळांची उन्हाळी सुटी रद्द अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांना यावर्षी उन्हाळी सुट्टीतही विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यावा लागणार आहे. दर आठवड्यात विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करून 30 जूनपूर्वी प्रत्येक विद्यार्थी भाषा आणि संख्याशास्त्र ज्ञानात परिपूर्ण करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने यंदा राज्यातील दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे यंदा सुट्टीतही शिक्षकांना विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अथवा ऑफलाईन अध्यापन करावे लागणार आहे. या उपक्रमातील दुसरी ते पाचवीच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के भाषा आणि अध्ययन क्षमता परिपूर्ण करण्याचे ध्येय आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य…
ॲसीड टाकून ठार मारण्याची धमकी देत विनयभंग भुसावळ -प्रतिनिधी शहरातील ३५ वर्षीय महिलेला अंगावर ॲसीड फेकण्याची आणि पतीसह मुलाला ठार मारण्याची धमकी देत व पैशांची मागणी करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. २२ मार्चरोजी सायंकाळी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आली आहे. भुसावळ शहरात ३५ वर्षीय महिला पती आणि मुलांसह वास्तव्याला आहे. त्या सरकारी नोकरी करतात. १ ते १५ मार्च या कालावधीत संशयित आरोपी अब्दुल रहीम शेख (वय २७ रा. स्टेट कॉलनी) याने महिलेला संबंध ठेवण्याची मागणी केली. अश्लिल चाळे करत विनयभंग केला, पैशांची मागणी करत फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि…