रोटरीच्या ‘धरोहर’ कार्यक्रमात माजी अध्यक्षांचा गौरव
जळगाव (प्रतिनिधी)–
शहरातील सर्वात पहिला व यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष साजरा करणाऱ्या रोटरी क्लब जळगावतर्फे स्थापनादिनानिमित्त क्लबच्या माजी अध्यक्षांचा परिवारासह ‘धरोहर’ या सोहळ्यात गौरव करण्यात आला.
अध्यक्ष ॲड. सागर चित्रे व मानद सचिव पराग अग्रवाल यांनी माजी अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर सिकची, प्रेम कोगटा, प्रा. रमेश लाहोटी, प्रा.पुनम मानूधने, डॉ. प्रदीप जोशी, राघवेंद्र काबरा, डॉ. जयंत जहागीरदार, प्रकाश (बाबा) दप्तरी, ॲड. प्रवीणचंद्र जंगले, अशोक जोशी, डॉ. दीपक पाटील, नित्यानंद पाटील, कॅप्टन मोहन कुलकर्णी, जितेंद्र ढाके, संदीप शर्मा, राजेश वेद, मनोज जोशी या मान्यवरांचा स्मृतिचिन्हासह गौरव केला.
माजी अध्यक्षांनी व जेष्ठ सदस्यांनी क्लबच्या ७५ वर्षांच्या वाटचालीला आणि आपल्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला.