Author: Sharad Bhalerao

जिल्हापेठ पोलिसात अज्ञाताविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी, २० मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, जळगाव शहरातील एका भागात १४ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. पीडित मुलगी ही १९ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगावातील नवीन बसस्थानक परिसरात असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले आहे. नातेवाईकांनी घेतला सर्वत्र शोध मुलीच्या नातेवाईकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू कोणतीही माहिती…

Read More

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर घेऊन टोळक्याने काढला पळ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील शिरसोली रस्त्यावरील असणाऱ्या ‘शुगर ॲण्ड स्पाईसी’ नावाच्या हॉटेलमध्ये रविवारी, १८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका टोळक्याने धुडगूस घालत तोडफोड केली. तोडफोड केल्यानंतर टोळक्याने हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही सोबत घेऊन पळ काढला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अशा घटनेमुळे परिसरातील हॉटेलच्या मालकांसह व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले. सविस्तर असे की, शिरसोली रस्त्यावरील हॉटेल ‘शुगर ॲण्ड स्पाईसी’ येथे काही तरुण जेवणासाठी आले होते. त्यांचे जेवण झाल्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये अचानक वाद घालण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवीगाळ…

Read More

जळगाव शहर पोलिसात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील टॉवर चौकात चोपडा येथील रहिवासी एका महिलेच्या पर्समधून १४ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर शनिवारी, १७ मे रोजी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. ही घटना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी १९ मे रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. जळगाव शहरातील टॉवर चौकात चोपडा येथील रहिवासी जानकीबाई भगवान पाटील (वय ५२) ह्या १७ मे रोजी कामानिमित्त आल्या होत्या. त्या सायंकाळी ५ वाजता बसमध्ये चढत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून १४ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या वस्तू लांबविल्या आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर जानकीबाई यांनी…

Read More

विभागीय मंडळाने दिल्या सर्व माध्यमिक शाळांना सूचना साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखालील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल गेल्या १३ मे २०२५ रोजी ऑनलाइन जाहीर झाला होता. त्यानंतर परीक्षेच्या गुणपत्रिका आणि तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेखांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवारी, २६ मे रोजी सकाळी ११ वाजता वितरित करण्यात येणार आहे. त्याचदिवशी दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेमार्फत गुणपत्रिकांचे (मार्कशिट) वाटप करण्यात येणार आहे. यासंदर्भात विभागीय मंडळांनी सर्व माध्यमिक शाळांना सूचना…

Read More

बांधकाम, घरेलू कामगारांतर्फे जोरदार निदर्शने, घोषणाबाजीने परिसर दणाणला साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील बांधकाम कामगार आणि घरेलू कामगारांच्या विविध मागण्यांसाठी तसेच कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ मिळावा अशा प्रमुख मागणीसाठी मंगळवारी, २० मे रोजी दुपारी १२ वाजता आंबेडकर मार्केट परिसरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर जळगाव जिल्हा बांधकाम कामगार संघटना आणि घरेलू कामगार संघटना यांच्यावतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या मोठ्या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता. निदर्शनांमध्ये कामगारांनी अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यापैकी प्रमुख मागणी होती की, बोगस आणि अपात्र कामगारांची नोंदणी तात्काळ थांबवावी. यासोबतच खऱ्या आणि पात्र बांधकाम कामगारांची कल्याणकारी मंडळाने तातडीने नोंदणी करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली. पात्र…

Read More

वाहनधारकांना सहन करावा लागतोय त्रास : प्रशासनाने लक्ष देण्याची मनसेची मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील पिंप्राळा ते सावखेडा कॉक्रिटीकरण रस्त्याचे काम सद्यस्थितीत प्रगतीपथावर आहे. मात्र, रस्त्यावरील साईडपट्ट्या भरलेल्या नाही. त्यामुळे वाहनधारकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी केली आहे. शंभर मीटरच्या परिसरात सोनी नगरातील नवीन बांधलेल्या पुलापासून देशी दारुच्या दुकानापर्यंत संरक्षण भिंतची गरज आहे. तेथे असणाऱ्या खोल नाल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तसेच सोनी नगर येथे बांधण्यात आलेल्या पूलाजवळील गटारींची उंची वाढविणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याठिकाणी पाऊस आल्यावर रस्त्यावर अक्षरश: नदीचे स्वरूप प्राप्त होते. अशा सोनी…

Read More

जळगाव तालुका पोलिसात अज्ञाताविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील एका भागात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना १७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रविवारी, १८ मे रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. जळगाव शहरातील एका भागात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. १७ मे रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. याप्रकरणी…

Read More

जि.प.सीईओंची माहिती, जामनेर तालुक्यातील हिवरखेड्यात मंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील ग्रामपंचायती पूर्णपणे सक्षम आणि समृद्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ मीनल करनवाल यांनी एक महत्त्वाकांक्षी ‘पंचायत सक्षमीकरण अभियान’ सुरू केले आहे. अभियानाची औपचारिक घोषणा सोमवारी, १९ मे रोजी जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या आर्थिक विकास व उत्पन्न वाढ घटकांतर्गत आयोजित सोलर ड्रायिंग प्रोजेक्टच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आली. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, सेवानिवृत्त अभियंता जे.के. चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेतील इतर महत्त्वपूर्ण अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत मीनल करनवाल यांनी अभियानाची माहिती दिली.…

Read More

जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरूणीचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना रविवारी, १८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जळगाव तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय तरूणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. तिच्या गावात राहणारा प्रभाकर खंडू महाले (वय ४०) हा १८ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित तरुणी ही घरात एकटी होती. तेव्हा तिच्या घरात घूसून तिचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. तरुणीने घेतली पोलिसात धाव दरम्यान, याप्रकरणी पीडित तरूणीने…

Read More

आरोपीला दिले तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात, एलसीबीची कामगिरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील चंदानगर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. अझहर निजाम खाटीक (रा. जळगाव) असे आरोपीचे नाव आहे. तो गुन्हा घडल्यापासून सुमारे तीन महिन्यांपासून फरार होता. दरम्यान, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला चंदानगर पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्तालय सायबराबाद (तेलंगणा) यांच्या ताब्यात दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सविस्तर असे की, चंदानगर पोलीस स्टेशनचे पथक आरोपीच्या शोधासाठी जळगाव जिल्ह्यात दाखल झाले होते. आलेल्या पथकाने जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यांना गुन्ह्याची माहिती दिली.त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांच्या मदतीची विनंती केली…

Read More