साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात अवैध धंदे आणि दादागिरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम समाजातील जागृत नागरिकांनी चाळीसगाव पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच परिसरात अवैध धंदे बंद करण्याची मागणीही निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत पोलीस आता काय कारवाई करता याकडे सर्व भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे. निवेदन देतांना सलिम मुजावर, जूनैद मुजावर, सादिक मुजावर, तनवीर, पत्रकार सलमान, एमआईएम नासिर मनियार, मुजम्मिल, वसीम मास्टर, शाहिद मिर्झा आदी उपस्थित होते. चाळीसगावात बाबांचा दर्गा हा एकात्मतेचे प्रतीक आणि धार्मिकस्थळ आहे. दर्गा परिसरात काही लोकांनी अवैधरित्या झोपड्या बनवून तेथे काही स्त्रिया…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विजय नाना पाटील आर्मी स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी दैनिक ‘साईमत’ वृत्तपत्राच्या “न्यूज फ्रेम”चे उद्घाटन करण्यात आले. याबद्दल उपस्थित मान्यवरांनी दै.’साईमत’चे तालुका प्रतिनिधी अनिल पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यावेळी प्राचार्य पी.एम.कोळी, प्रभारी कमांडंट सुभेदार मेजर नागराज पाटील, सुभेदार मेजर श्रीराम पाटील, नायक सुभेदार भटू पाटील, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी के.वाय.देवरे, बी.एड. कॉलेजचे प्राचार्य प्रा.पी.पी. चौधरी, आय.टी.आय.चे प्राचार्य के.बी.बाविस्कर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.शुभांगी चव्हाण, कृषी विद्यालयाचे प्राचार्य प्रा.संदीप पाटील, दै.’साईमत’चे तालुका प्रतिनिधी अनिल पाटील, शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख शरद पाटील, सदस्य व्ही. डी. पाटील, संजय पाटील यांच्यासह युनिटचे प्राध्यापक वृंद, शिक्षक वृंद, शिक्षिका…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील रणाईचे येथील रहिवासी तथा सध्या गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त अति संवेदनशील व अतिदुर्गम असलेल्या ठिकाणी केलेल्या उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलीस उपनिरीक्षक सतीष वामन पाटील यांना १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. गेल्या २ वर्षांपासून सतीष पाटील हे विशेष अभियान पथक (C ६०), गडचिरोली येथे कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्हा हा नक्षलदृष्ट्या अति संवेदनशील व दुर्गम असल्याने त्याठिकाणी C ६० कडून सतत नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येते. त्यादरम्यान झालेल्या नक्षल चकमकी दरम्यान केलेले उत्कृष्ट पथक नेतृत्व व केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सतीष पाटील यांना गडचिरोली पोलीस तसेच महाराष्ट्र पोलीस दलासाठी सर्वोच्च व…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समारोपीय वर्षानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश’ उपक्रमांतर्गत श्रीमती द्रौ.रा.कन्या शाळेने रॅलीचे आयोजन केले होते. सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एस.सूर्यवंशी, पर्यवेक्षक व्ही.एम. पाटील, ज्येष्ठ शिक्षिका एस.पी.बाविस्कर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती आठवले यांनी ध्वजस्तंभाचे पूजन केले. त्यानंतर ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत म्हटले गेले. नंतर करुणा क्लब व शाळेच्या सांस्कृतिक मंडळातर्फे देशभक्तीपर गीत म्हटले गेले. त्यानंतर तालुकास्तरीय बुद्धीबळ, कॅरम व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनींचा सत्कार केल्यानंतर शाळेतून रॅलीला सुरुवात झाली. रॅलीला शाळेतून सुरुवात होऊन डॉ.बाविस्कर यांच्या घराजवळून, डॉ.मुठे यांच्या हॉस्पिटल जवळून महाराणा प्रताप चौक, विजय मारोती मंदिर, बस स्टँड मार्गे तिरंगा चौकात आली. तिथे नगर परिषदेने आयोजित केलेल्या…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यात मंगरूळ येथे दहावीला प्रथम आलेल्या योगिता पाटील आणि नेहा पाटील या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनी गावातील अग्निवीर म्हणून देशसेवेत गेलेल्या व स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या तरुणांचा ग्रामविकास शिक्षण मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. तसेच विविध कार्यकारी सोसायटीत देविदास पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीत माजी सैनिक सयाजीराव पाटील यांच्या हस्ते, स्व.अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात मुरलीधर पाटील यांच्या हस्ते, जि.प. प्राथमिक शाळेत शालेय समितीचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी श्रीकांत पाटील, संजीव सैंदाणे, अमोल पाटील, वाल्मिक पाटील, विश्वास पाटील, चंपालाल शिंदे, संदीप पाटील, निंबा पाटील, रतीलाल पाटील, डिंपल पाटील उपस्थित होते.
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यात विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचा मृतदेह एसडीआरएफ पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नांनी शोधून काढला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शोध व बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सविस्तर असे की, पारोळा येथील वंजारी शिवारालगतचे रहिवासी विनोद धोत्रे यांचा चिरंजीव शुभम धोत्रे (वय १७) हा शिक्षणाकामी अमळनेर येथे राहत होता. तो प्रताप महाविद्यालयात ११ वीत शिक्षण घेत होता. त्याच्यासोबत चार-पाच मित्रांसह तो विहिरीत पोहायला गेला होता. विहिरीत उडी मारल्यावर तो वर आला नाही. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर ही घटना स्थानिकांनी तात्काळ मदत व पुनर्वसन मंत्री अनिल…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पाळधी गावात एका तरूणाच्या आयडीवर इन्स्टाग्रामवर महापुरूषांबद्दल अवमानकारक आणि आक्षेपार्ह कमेंट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील विशाल सरद नन्नवरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरच्या अकाऊंटरवर महापुरूषांचा फोटो अपलोड केला होता. त्यावर मंगळवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता एका अनोळखी व्यक्तीने आक्षेपार्ह आणि अवमानकारक कमेंट करून जातीय तेढ निर्माण केल्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर विशाल नन्नवरे याने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील पिंप्री येथे बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी दोन जण ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रयत्न करीत असतांना धरणगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दोन तरुण बुधवारी, १६ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या दुकानांवर जात त्यांच्याकडील ५०० रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. दुकानदारांना मात्र, ५०० ची नोट बनावट असल्याचे लागलीच लक्षात आले. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उध्दव ढमाले यांनी पथकाला पिंप्री गावात रवाना केले. या पथकाने बराच वेळ बाजारात त्यांचा मागोवा घेतला. एका दुकानावर अखेर दोघे सापडले. त्यानुसार…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील खडकदेवळा येथील राज्य महामार्गावर सुरू असलेले अनधिकृत चारीचे काम तात्काळ थांबविण्यात यावे. चारीच्या कामामुळे ग्रामस्थांना होत असलेला त्रास आणि चारीमुळे अपघातास आमंत्रण देण्याचा प्रकार थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी अर्जाद्वारे केली आहे. सविस्तर असे की, पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु.येथील तारखेडा ते पिंपळगाव राज्य महामार्ग क्र. १७ यावर १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायतीची संमती नसतांना आणि कोणताही ठराव नसतांना सदस्यांना न विचारता गावातील अनिल विश्राम पाटील यांनी जेसीबी मशीन लावून रस्त्याच्या उत्तर दिशेच्या रस्त्यावर पूर्व-पश्चिम राज्य महामार्ग क्र. ४८ पासून परत येवून सुरेश काशिनाथ सिनकर यांच्या घरापर्यंत चारी कोरून सार्वजनिक…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील जिकरा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात जामनेर येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने वर्चस्व मिळविले आहे. स्पर्धेत २२ शाळांचा समावेश होता. तसेच त्यात १०२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. जिल्हा क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जामनेर येथील जिकरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे शालेय तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा आयोजित केल्या होत्या. आपल्या विद्यालयातील १७ वर्ष वयोगटातील ३ विद्यार्थिनींची तर १७ वर्ष वयोगटातील १ विद्यार्थी अशा वैयक्तिक चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. त्यात साक्षी राजेंद्र तेली,…