विहिरीत पडलेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यात विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचा मृतदेह एसडीआरएफ पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नांनी शोधून काढला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शोध व बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

सविस्तर असे की, पारोळा येथील वंजारी शिवारालगतचे रहिवासी विनोद धोत्रे यांचा चिरंजीव शुभम धोत्रे (वय १७) हा शिक्षणाकामी अमळनेर येथे राहत होता. तो प्रताप महाविद्यालयात ११ वीत शिक्षण घेत होता. त्याच्यासोबत चार-पाच मित्रांसह तो विहिरीत पोहायला गेला होता. विहिरीत उडी मारल्यावर तो वर आला नाही. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर ही घटना स्थानिकांनी तात्काळ मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या कानावर टाकली.

पुनवर्सन मंत्र्यांनी दूरध्वनीवरून केले सांत्वन

मंत्री ना. अनिल पाटील यांनी रेल्वे प्रवासात असतांना सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हाधिकारी आणि एसडीआरफचे राज्य संचालक यांना मदत व बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले होते. एमडीआरएफने स्थानिक आदिवासींच्या तरूणांच्या मदतीने मृतदेह शोधून काढला आहे. पुनर्वसन मंत्र्यांनी तरुणांच्या कुटुंबाचे दूरध्वनीवरून सांत्वन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here