साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत पीर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात अवैध धंदे आणि दादागिरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम समाजातील जागृत नागरिकांनी चाळीसगाव पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे. तसेच परिसरात अवैध धंदे बंद करण्याची मागणीही निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत पोलीस आता काय कारवाई करता याकडे सर्व भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे. निवेदन देतांना सलिम मुजावर, जूनैद मुजावर, सादिक मुजावर, तनवीर, पत्रकार सलमान, एमआईएम नासिर मनियार, मुजम्मिल, वसीम मास्टर, शाहिद मिर्झा आदी उपस्थित होते.
चाळीसगावात बाबांचा दर्गा हा एकात्मतेचे प्रतीक आणि धार्मिकस्थळ आहे. दर्गा परिसरात काही लोकांनी अवैधरित्या झोपड्या बनवून तेथे काही स्त्रिया घाणेरडे काम आणि काही लोक गांजा, बटण गोळी, कुत्ता गोळी वगैरे असे अवैध धंदे करत आहे. तेथे आलेल्या भाविकांच्या सामानाची चोरी, मोबाईल चोरी, मंगळसूत्र चोरी, बॅगांची चोरी असा त्रास नेहमी येथे होतो. चोरी करून तिथल्या तिथे झोपडीत असे चोर लपून अचानक गायब होऊन जातात. त्यामुळे दर्गा परिसराला बदनाम करण्याचे काम करत असल्यामुळे तेथे आपण योग्य ती कारवाई करून त्या सर्व झोपड्या व परिसर साफ करून त्यांना सूचना देऊन ते धार्मिक स्थळ स्वच्छ व सुंदर नशा मुक्त अभियान अंतर्गत परिसर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी सहकार्य करावे, अशी चाळीसगाव नागरिकांसह भाविकांनी मागणी केली आहे.