मंगरूळ येथे विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यात मंगरूळ येथे दहावीला प्रथम आलेल्या योगिता पाटील आणि नेहा पाटील या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनी गावातील अग्निवीर म्हणून देशसेवेत गेलेल्या व स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या तरुणांचा ग्रामविकास शिक्षण मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

तसेच विविध कार्यकारी सोसायटीत देविदास पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायतीत माजी सैनिक सयाजीराव पाटील यांच्या हस्ते, स्व.अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात मुरलीधर पाटील यांच्या हस्ते, जि.प. प्राथमिक शाळेत शालेय समितीचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी श्रीकांत पाटील, संजीव सैंदाणे, अमोल पाटील, वाल्मिक पाटील, विश्वास पाटील, चंपालाल शिंदे, संदीप पाटील, निंबा पाटील, रतीलाल पाटील, डिंपल पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here