Author: Sharad Bhalerao

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित डॉ.जे.जी. पंडित माध्यमिक विद्यालय येथे चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल इस्रोची प्रतिकृती तयार केली. त्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी (ISRO) या शब्दाची प्रतिकृती तयार करून भारतीय चंद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. यात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी सर्व शास्त्रज्ञांसह भारतीयांचे कौतुक करण्यात आले. मोहिमेबद्दल विद्यालयातील शिक्षक व्ही.एम.शिरपुरे, बी.एन.पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले यांनी विद्यार्थ्यांना मोहिमेचा उद्देश आणि भविष्यात होणारे फायदे याविषयी माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी. चिंचोले, उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिकृती तयार करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार ज्ञानेश्वर…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सुनसगाव बु. येथील साहित्यिक तथा शिक्षक डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘पाडा’ या बहुचर्चित ग्रामीण कादंबरीचा २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. एम.ए. प्रथम वर्ष ग्रामीण साहित्य या अभ्यासक्रमात ‘पाडा’ ही कादंबरी विशेष कलाकृती म्हणून अभ्यासली जाणार आहे. ‘पाडा’ ही कादंबरी खान्देशी केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा व वेदना मांडणारी कलाकृती आहे. मराठी ग्रामीण साहित्यातील ‘पाडा’ चे स्थान निर्विवाद आहे. यापूर्वीही ही कादंबरी अभ्यासक्रमात होती. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथेही डॉ.कोळी यांचे ‘अशानं आसं व्हतं’ हे आत्मचरित्र एम.ए.मराठी अभ्यासक्रमात आहे. शिवाय मुंबई विद्यापीठ बी.ए.मराठी…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील पीपल्स सोशल फाउंडेशनच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त जयहिंद माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक खलाणे होते. यावेळी जिल्हा परिषद गटनेते शशिकांत साळुंखे, मा.उपनगराध्यक्ष भगवान पाटील, मा.शिक्षण सभापती रामचंद्र जाधव, मा पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील, डॉ.संदीप देशमुख, ॲड.निलेश निकम, योगेश पाटील, मुख्याध्यापक अभिजीत खलाणे, ॲड.आकाश पोळ (अध्यक्ष-पीपल्स सोशल फाउंडेशन), ब्रिजेश पाटील (अध्यक्ष-रोटरी क्लब, चाळीसगाव), डॉ.निकम, ॲड.कविता जाधव, शिवसागर पाटील, प्रकाश पाटील, राहुल पाटील (संचालक-कृषी बाजार समिती चाळीसगाव), ॲड.प्रेम निकम, ॲड.तुषार पाटील, ॲड.मयूर निकम आदी उपस्थित होते. यावेळी ॲड.आकाश पोळ, रामचंद्र जाधव, अशोक खालणे यांनी मनोगत व्यक्त…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा १०८ ही २०१४ पासून सुरु केली आहे. ही रुग्णवाहिका चालविणारे चालक हे २०१४ सालापासून अत्यंत कमी पगारात काम करत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र रुग्णवाहिका क्रमांक १०८ वाहनचालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, या विषयावर अद्यापही तोडगा न निघाल्याने महाराष्ट्रातील १०८ रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या चालकांनी बेमुदत संप पुकारला असल्याची माहिती जळगावचे जिल्हाध्यक्ष हिम्मत धनगर यांनी दिली. तसेच चाळीसगावला पत्रकारांशी संवाद साधताना ललीत पाटील यांनी ही माहिती दिली. बीव्हीजी कंपनीकडून वाहन चालकांनी अत्यंत कमी पगार देत शोषण सुरू असल्याचा आरोप चालकांनी केला…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील लोकनायक स्व.महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान, हिरकणी महिला मंडळ, युगंधरा फाऊंडेशन, चाळीसगाव विकास मंच तसेच भुजल अभियान व पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने घेतलेल्या कराटे प्रशिक्षण वर्गास युवतींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा २५० विद्यार्थिनींनी लाभ घेतला. यावेळी प्रशिक्षिका वर्षा चौधरी यांनी वेगवेगळ्या प्रात्यक्षिकेतून मुलींना स्वरक्षणाविषयक टिप्स दिल्या. प्रत्येक युवती आणि स्त्री यांनी स्वरक्षण प्रशिक्षण शिकून आत्मनिर्भर व्हायला हवे. आज राष्ट्ररक्षण करणारी, स्वतःचे रक्षण करू शकणारी, सुसंस्कारित पिढी घडविणाऱ्या स्त्रियांची आवश्यकता आहे. विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे गिरविता यावेत, यासाठी कराटे प्रशिक्षण घेण्यात आले. यशस्वीतेसाठी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, चाळीसगाव पोलीस दल यांनी परिश्रम…

Read More

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मीकी यांच्या तपोभूमीत भडगाव रस्त्यावरील न्यू भूषण मंगल कार्यालय येथे आदिवासी कोळी महासंघाचा कार्यकर्ता मेळावा नुकताच घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे होते. मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक-अध्यक्ष तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. दशरथ भांडे होते. मेळाव्यात आदिवासी कोळी महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना डॉ.दशरथ भांडे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तपत्र देऊन सत्कार केला. प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ नेते माजी सभापती बाबुराव मोरे, न्यायालयीन कोअर कमेटीचे अध्यक्ष रघुनाथराव इंगळे, विदर्भ विभागीय अध्यक्ष मनोहरराव बुध, राज्य संघटक प्रशांत तराळे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर रमेश…

Read More

साईमत, भडगाव : प्रतिनिधी पुणे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय तथा भडगाव तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने रजनीताई देशमुख कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भडगाव येथील क्रीडांगणावर भडगाव तालुकास्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलींच्या गटात आदर्श कन्या विद्यालयाच्या संघाने जवाहर हायस्कूल विरुध्द डावाने विजय मिळविला तर १७ वर्षाआतील मुलींच्या गटात आदर्श कन्या विद्यालयाने एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात माध्यमिक विद्यालय, वाडे संघाचा पराभव करत जेतेपद प्राप्त केले. वाडे विद्यालयास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर गटात अँग्लो उर्दू हायस्कूल, भडगाव हा संघ तृतीयस्थानी राहिला. १९ वर्षाआतील मुलींमध्ये आदर्श कन्या विद्यालय, भडगावचा संघ विजयी ठरला.…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील भराडी फाट्याजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सोमवारी ट्रॅक्टरवरील अज्ञात चालका विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, चेतन गोकुळ चव्हाण (वय २५, रा. चाळीसगाव) हा त्याचा मित्र किरण राठोड (वय २३, रा.मालखेडा ता. जामनेर) यांच्यासोबत दूचाकीने (क्र.एमएच १९ एए २१४०) जामनेरकडून भराडी फाट्याकडे जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारे ट्रॅक्टरने (एमएच १९ बीजी ९१५०) दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत चेतन चव्हाण आणि किरण राठोड हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर घेऊन पसार…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणारी १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेत अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, शहरातील एका भागात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पीडित मुलीला राहत्या घरातून काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याचे समोर आले. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सायंकाळी साडेसहा वाजता नातेवाईकांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील नेरी दिगर येथील एका तरूण शेतकऱ्याची दूचाकी बाजार समितीच्या आवारातून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, ऋषीकेश मदनसिंग पाटील (वय २३, रा. कुसुंबा ता.जि.जळगाव) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी कामानिमित्त ऋषीकेश हा त्याची दूचाकीने (क्र.एमएच १९ सीएम ४४७) जामनेर तालुक्यातील नेरीदिगर येथील बाजार समितीत आला होता. त्यावेळी त्याने दूचाकी बाजार समितीच्या आवारातच लावलेली होती. दरम्यान, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली दूचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला. परंतू…

Read More