पाचोऱ्यात आदिवासी कोळी महासंघाचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात

0
3

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मीकी यांच्या तपोभूमीत भडगाव रस्त्यावरील न्यू भूषण मंगल कार्यालय येथे आदिवासी कोळी महासंघाचा कार्यकर्ता मेळावा नुकताच घेण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे होते. मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदिवासी कोळी महासंघ आदिवासी संघर्ष समितीचे संस्थापक-अध्यक्ष तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. दशरथ भांडे होते. मेळाव्यात आदिवासी कोळी महासंघाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना डॉ.दशरथ भांडे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तपत्र देऊन सत्कार केला.

प्रमुख पाहूणे म्हणून ज्येष्ठ नेते माजी सभापती बाबुराव मोरे, न्यायालयीन कोअर कमेटीचे अध्यक्ष रघुनाथराव इंगळे, विदर्भ विभागीय अध्यक्ष मनोहरराव बुध, राज्य संघटक प्रशांत तराळे, उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर रमेश घाटे, अमरावती कर्मचारी अध्यक्ष गणेशराव बोपटे, जळगाव जिल्हाध्यक्ष संजय कांडेलकर, युवक जिल्हाध्यक्ष नामदेव कोळी, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी शेवरे, ग्रामीण उपाध्यक्ष अनिल सावळे, ॲड.अजय जाधव, अण्णासाहेब फुणगे, संजय मेढे, संजयकुमार सोनवणे, तुकाराम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती

मेळाव्याला उत्तर महाराष्ट्र संघटन सचिव जितेंद्र कोळी, जळगाव जिल्हा जळगाव महानगर अध्यक्षा शोभा कोळी, महिला संपर्क प्रमुख रजनी सोनवणे, जिल्हा सचिव दीपक कोळी, ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख संजय मेढे, पाचोरा तालुकाध्यक्ष दशरथ जाधव, भडगाव तालुकाध्यक्ष कैलास जाधव, मार्गदर्शक रवींद्र जाधव, चाळीसगाव तालुका महिला अध्यक्षा ज्योती शेवरे, सचिव प्रमिला कोळी, साहेबराव सूर्यवंशी, सुभाष सूर्यवंशी, लक्ष्मणकांत सूर्यवंशी, राजु गुडेकर, दिलीप सोनवणे, विजय बागुल, नेहरू शेवरे, भागवत कोळी, अभिमन शेवरे, माधवराव कोळी, संतोष कोळी, उमेश ठोंबरे, अण्णा कोळी, दिलीप सोनवणे, विजय मोरे, नाना मोरे, धनराज काकडे, किरण कोळी, बाबुलाल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

ॲड.चेतन पाटील, अविनाश कोळी यांचा निषेध

शासकीय योजनांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळत नाही. संपूर्ण समाज बेचिराग होत आहे. शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातींचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सरसकट तात्काळ देण्याची कार्यवाही करावी. शासनास आपल्या हिताचा अहवाल सादर न केल्याबद्दल ॲड.चेतन पाटील आणि अविनाश कोळी यांचा मेळाव्यात जाहीर निषेध करण्यात आला.

यांनीही व्यक्त केले मनोगत

मेळाव्यात प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, राज्य संघटक प्रशांत तराळे, ज्येष्ठ नेते माजी सभापती बाबुराव मोरे, उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अण्णासाहेब फुणगे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी शेवरे, ॲड.अजय कोळी, तुकाराम मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. मेळाव्यात समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, महिला, युवक कर्मचारी बांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. मेळाव्याचे आयोजन प्रल्हाद सोनवणे, संजयकुमार सोनवणे, दशरथ शेवरे, सदाशिव झोडगे, राहुल कोळी यांनी केले. प्रास्ताविक किर्तनकार निवृत्ती चित्ते, सुत्रसंचालन प्रल्हाद सोनवणे तर आभार दशरथ शेवरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here