विद्यापीठाच्या एम.ए.च्या मराठी अभ्यासक्रमात ‘पाडा’ कादंबरीचा समावेश

0
2

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील सुनसगाव बु. येथील साहित्यिक तथा शिक्षक डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘पाडा’ या बहुचर्चित ग्रामीण कादंबरीचा २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात समावेश झाला आहे.

एम.ए. प्रथम वर्ष ग्रामीण साहित्य या अभ्यासक्रमात ‘पाडा’ ही कादंबरी विशेष कलाकृती म्हणून अभ्यासली जाणार आहे. ‘पाडा’ ही कादंबरी खान्देशी केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा व वेदना मांडणारी कलाकृती आहे. मराठी ग्रामीण साहित्यातील ‘पाडा’ चे स्थान निर्विवाद आहे. यापूर्वीही ही कादंबरी अभ्यासक्रमात होती. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथेही डॉ.कोळी यांचे ‘अशानं आसं व्हतं’ हे आत्मचरित्र एम.ए.मराठी अभ्यासक्रमात आहे. शिवाय मुंबई विद्यापीठ बी.ए.मराठी प्रथम वर्ष अभ्यासक्रमात ‘चुराडा’ कथेचा समावेश आहे.

डॉ.कोळी तावडी भाषेचे अभ्यासक

जळगाव जि.प.अंतर्गत गोंडखेल येथील जि.प.च्या शाळेत प्राथमिक शिक्षक असलेल्या डॉ.कोळी यांची ‘धूळपेरणी’ ही कविता ४ थीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकात आहे. ग्रामीण साहित्यातील आघाडीचे लेखक असलेले डॉ.कोळी तावडी भाषेचे अभ्यासक आहेत. त्यांच्या अनेक कलाकृती प्रकाशित आहेत. ‘पाडा’ कादंबरीचे जळगाव आकाशवाणी केंद्रावरून झालेले अभिवाचन विशेष गाजलेले आहे. अभ्यासक्रमात ‘पाडा’ कादंबरीचा समावेश झाल्याबद्दल मान्यवर, साहित्यिक, लेखक अनेकांनी डॉ.कोळी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here