इस्रोची प्रतिकृती तयार करून लोहारा विद्यालयात आनंदोत्सव साजरा

0
2
DCIM100MEDIADJI_0298.JPG

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित डॉ.जे.जी. पंडित माध्यमिक विद्यालय येथे चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याबद्दल इस्रोची प्रतिकृती तयार केली. त्यात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी (ISRO) या शब्दाची प्रतिकृती तयार करून भारतीय चंद्रयान ३ मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला. यात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी सर्व शास्त्रज्ञांसह भारतीयांचे कौतुक करण्यात आले.

मोहिमेबद्दल विद्यालयातील शिक्षक व्ही.एम.शिरपुरे, बी.एन.पाटील यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले यांनी विद्यार्थ्यांना मोहिमेचा उद्देश आणि भविष्यात होणारे फायदे याविषयी माहिती दिली. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी. चिंचोले, उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिकृती तयार करण्यात आली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार ज्ञानेश्वर राजपूत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here