साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील ज्ञानगंगा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९ वर्ष वयोगटातील १२ वी विज्ञानचा विद्यार्थी रितेश किसन चव्हाण याने नाशिक येथे १९ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यस्तरीय ग्रेपलिंग असोसिएशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्राँझ पदक पटकाविले आहे. याबद्दल रितेशचा शाळेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ना. गिरीष महाजन, सचिव साधना महाजन, संस्थेचे संचालक ॲड.शिवाजी सोनार, संचालक मंडळ, प्राचार्य आर.जे.सोनवणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी रितेशचे कौतुक केले आहे.
Author: Sharad Bhalerao
साईमत, जामनेर : प्रतिनिधी भारत भूमीचे संरक्षण करणाऱ्या देशासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना रक्षाबंधनानिमित्त जामनेर येथील वंदन मातृभूमी प्रतिष्ठाच्यावतीने राखी पाठविण्यात आली. काश्मीर, हिमाचल प्रदेश, ओरिसा राज्यातील २ हजारांपेक्षा जास्त जवानांना राखी पाठविण्यात आली आहे. जामनेर शहरातील वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांना वंदन मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने आवाहन केले होते.”एक राखी भारतीय सैनिकांसाठी” या आवाहनाला साथ देत हजारो विद्यार्थ्यांनी भारतीय सैनिकांसाठी रक्षा पाठविण्याची व्यवस्था केली. यासाठी वंदन मातृभूमी प्रतिष्ठानचे राहुल चव्हाण, शांताराम काळे, अंकुश जोशी, शेख सईद, शेख इम्रान, मयूर चौधरी, निलेश देवरे, संजय सपकाळ, हर्षल सूर्यवंशी, योगेश गोसावी आदी पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील अमळगाव-दोधवद शिवारात एका शेतात कैट जातीचे हरीण मृतावस्थेत आढळून आले आहे. ही घटना संबंधित शेतमालकाला सकाळी दैनंदिन कामकाजानिमित्त शेतात गेल्यावर नजरेस पडली. त्यांनी लागलीच ही घटना वनविभागाला कळविली. हरणाला सर्पदंश किंवा विंचू (नैसर्गिक) चावल्याने मयत झाले असावे? असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. दरम्यान, पारोळा वनविभागाने घटनास्थळी जावून मृत हरीणची विल्हेवाट लावण्यासाठी ताब्यात घेतले. हरणाचा मृत्यू हा सर्पदंशने झाला असावा? असा अंदाज व्यक्त होत आहे.
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी आपल्या बँक खात्यातून गेल्या १४ ऑगस्ट रोजी गोपाल संजय पाटील यांनी चुकून अनोळखी मोबाईल नंबरवर सुमारे ४९ हजार ८०० रूपयांची रक्कम पाठविली गेली होती. ही रक्कम बिहार येथील एका व्यक्तीच्या खात्यावर गेले होते. याबाबत त्यांनी सविस्तर तक्रार अप्पर पोलीस अधीक्षक व सहाय्यक उपअधीक्षक, चाळीसगाव यांच्याकडे केली होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी तक्रारीची त्यांचे स्तरावर दखल घेवून गोपाल पाटील यांना धीर दिला. याकामी ॲड.समीर तक्ते यांनी शर्थीचे प्रयत्न करून व समयसूचकता तसेच आपले संभाषण कौशल्य वापरून तत्काळ बिहार पोलिसांशी संपर्क करून झाल्या प्रकाराची माहिती दिली. रक्कम ४९ हजार ८०० रूपये शकील अहमद नामक व्यक्तीला परत…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी शहरातील रस्त्यांसाठी १० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. ना.अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत १० कोटी निधीस मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील रस्ते कात टाकणार आहेत. याच निधीतून विविध प्रभागात रेट्रो फिटिंग पथदिवे, योगा हॉल आणि भूखंड सुशोभीकरण आदी कामे होणार आहेत. या कामांची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे यातील बहुतांश रस्ते हे अमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक ९ म्हणजे मुख्य बाजारपेठ परिसरातील आहे. या नव्या रस्त्यांमुळे व्यावसायिक व नागरिकांची समस्या सुटणार आहे. या कामांतर्गत काही रस्ते ट्रीमिक्स काँक्रीटीकरणासह होणार आहेत. याबाबतचा शासन…
प्रशांत चौधरी, धानोरा, ता. चोपडा : ‘कानबाई चालनी गंगेवरी माय चालनी गंगेवरी, तुले काय लागावं व्हंत माय सांगी दे तु माले…!’ संपूर्ण खान्देशात सुपरिचीत असलेला कानबाई, रानबाई उत्सवास रविवारपासून सुरुवात होत आहे. रोटांचा सण म्हणून हा कानबाई उत्सव मोठ्या उत्सवात ग्रामीण भागात साजरा करण्यात येतो. कानबाई मातेच्या स्थापनेच्या एक दिवस अगोदर ‘सपत्या ‘ हा सण साजरा करतात. हा सण श्रावण महिन्यात प्रत्येकवर्षी शनिवारीच येतो. दुसऱ्या दिवशी कानबाईचे रोट असतात. अशी होते कानबाईची स्थापना श्रावण महिन्यातील येणाऱ्या पहिल्या रविवारी कानबाईची स्थापना आपल्या खान्देशात मोठ्या उत्साहात करतात. प्रत्येक कुटूंबात आपआपल्या मानानुसार कानबाई मातेचे स्वरुप तयार करतात. त्यात तांब्याची कानबाई, नारळाची कानबाई व…
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी येथील नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीतर्फे नगरपरिषद स्थलांतराला विरोध आहे. गावातील पाच हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील यांना वरणगाव न. प. स्थलांतर विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी नुकतेच दिले. त्यानंतर आ.पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक लावण्याचे कृती समितीला आश्वासन दिले. निवेदन देतेवेळी नगरपरिषद स्थलांतर विरोधी कृती समितीचे उपाध्यक्ष अश्ाफाक काझी, सचिव महेश सोनवणे, सहसचिव संतोष माळी, सदस्य शशिकांत चौधरी, सुनील भोई, संदीप वाघ, प्रकाश मराठे आदी उपस्थित होते. वरणगावातील नगरपरिषदची इमारत ही इतिहासकालीन आहे. गावात एकमेक शासकीय वास्तू असल्याने २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी बस स्टँड येथून विद्यार्थांची शाळेची प्रभात…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील डॉ. सौ. प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय येथे भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्याने विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सत्यजित पूर्णपात्रे, सचिव डॉ. शुभांगी पूर्णपात्रे यांच्या प्रेरणेने व विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून भारताचा नकाशा साकारला. यावेळी विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय” असा जयघोष करून शालेय परिसर दणाणून टाकला. शास्त्रज्ञांना दिली सलामी चांद्रयान मोहिमेबाबत मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे तयार करून त्यावर तिरंगा ध्वज फडकवून शास्त्रज्ञांना सलामी दिली. यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
साईमत, चोपडा : प्रतिनिधी शहरातील मिलिंद वसतिगृहात तपासणीसाठी आलेल्या समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी गरजू विद्यार्थ्यांना पुरेसे ताट नसल्याचे लक्षात येताच खिशातील पदरमोड करून २५ ताट लागलीच मागवून वसतिगृहास भेट दिले. यावेळी कर्मचारी वृंद भारावून गेल्याच्या ह्रदय स्पर्शी प्रसंगाने अधिकाऱ्याने माणुसकीचे दर्शन घडविले आहे. चोपडा शहरातील मिलिंद वसतीगृह, सावता माळी, श्री संत गाडगेबाबा आणि महात्मा फुले वसतिगृह येथे प्रशासकीय कामाचा भाग म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, समाज निरीक्षक व्ही.टी.बाविस्कर व समाज कल्याण निरीक्षक भरत चौधरी, पवार आदी तपासणीसाठी आले होते. त्यांना अचानक विद्यार्थ्यांना ताट अपूर्ण असल्याचे लक्षात आले. त्यानंतर विजय रायसिंग यांनी आपण अधिकारी असल्याचे बाजूला ठेवत…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील विद्या विहार कॉलनीतील भाविकांचे श्रद्धास्थान नवीन निर्माण झालेल्या भव्य दिव्य विद्देश्वर महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तीन दिवस चालणार आहे. यानिमित्त २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मिरवणूक काढण्यात आली. रविवारी, २७ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत पूजा होणार आहे. सोमवारी, २८ रोजी सकाळी महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तिर्थजी महाराज कपिलेश्वर मंदिर, निम यांच्या हस्ते कळस लावणे तसेच दुपारी १२ वाजता प्राणप्रतिष्ठा होणार आहे. परिसरातील सर्व भाविकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक विद्देश्वर महादेव मंदिर समिती, विद्या विहार कॉलनीतील सर्व भाविक तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी केले आहे.