साईमत, वरणगाव : प्रतिनिधी आयुध निर्माणीमधील सुरक्षा रक्षक सकाळी आपल्या दुचाकीने कर्तव्यावर जात असतांना वाटेवरील नाल्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सविस्तर असे की, वरणगाव फॅक्टरीचे सुरक्षा रक्षक (दरबान) शुभम बबलू तायडे (वय २३, रा. भुसावळ) हे नेहमीप्रमाणे वरणगावमार्गे फॅक्टरी येथे सकाळी सात वाजेदरम्यान आपल्या कर्तृत्वावर जात होते. मात्र, रविवारी सकाळपर्यंत सुरु असलेल्या पावसामुळे या मार्गावरील लवकीच्या नाल्याला पूर आला असल्याचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे त्यांनी नाल्यावर असलेल्या लहानशा पुलावरुन आपली दुचाकी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाल्यातील अचानक आलेल्या पुराच्या प्रवाहाने…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी माझ्या आपत्तीच्या काळात अमळनेरकरांनी मदत केली नसती तर माझे राजकीय पुनर्वसन झाले नसते अशा भावनिक शब्दात ना.अनिल पाटील यांनी अमळनेरातील जनतेचे ऋण व्यक्त केले. अमळनेर शहरातील सर्व संस्था व समाजातर्फे नागरी सत्कार समिती स्थापन करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी, १० सप्टेंबर रोजी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. त्या सत्काराला उत्तर देतांना ते बोलत होते. त्यांनी भावनिक होऊन सगळ्या नागरिकांचे आभार मानले. हा सत्कार सर्वपक्षीय पदाधिकारी, सर्व संघटना, सर्व विविध समाजाचे प्रतिनिधी, विविध संस्थांचे प्रतिनिधी अशा सर्वांच्यावतीने मोठ्या उत्साहात झाला. व्यासपीठावर खा.उन्मेष पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, सभापती अशोक पाटील, अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती, चाळीसगाव आणि वकील संघ चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वादपूर्व प्रकरणांच्या कर्ज व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या वसुलीकरीता राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. यावेळी तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्या.एन. के. वाळके, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर तथा न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीसगाव श्रीमती एस.आर.शिंदे, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. पी.एस.सोनवणे, उपाध्यक्ष ॲड. एच.एल. करंदीकर, सचिव ॲड. जे.एस.सैय्यद, सहसचिव ॲड. बी.आर.पाटील, खजिनदार श्रीमती एन.एम. लोडाया, ॲड.माधुरी बी. एडके, सदस्य तसेच पॅनल मेंबर्स ॲड. कविता जाधव, ॲड. एल.एच.राठोड, पी.एल.व्ही. रमेश पोतदार, देवेश दीपक पवार, न्यायालयीन…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाने पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती तथा वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन केले होते. लोकन्यायालयात पाचोरा न्यायालयात दाखल असलेली १६० दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली निघून १ कोटी ८१ लाख ३९ हजार ४५७ रुपयांची वसूली केली. तसेच ७७१ वादपूर्व प्रकरणांचा निपटारा होवून ७५ लाख ४४ हजार ७८५ रुपयांची वसूली झाली, अशी पाचोरा न्यायालयात ९३१ प्रकरणामध्ये २ कोटी ५६ लाख ८४ हजार २४२ रुपयांची वसूली करण्यात आली. लोकन्यायालयात २ दिवाणी प्रकरणे व्हरच्युअली व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निकाली काढण्यात आले. कार्यक्रमास तालुका विधी सेवा…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशनच्या ‘इंटक’ संघटनेचा मोठा विजय झाला आहे. तसेच बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या लढाईला अखेर यश मिळाले आहे. सर्वांचा परिपाक म्हणून वितरण प्रशासनाने पत्र क्र. २६४७५ दि.१ सप्टेंबर २०२३ नुसार कामगारांना शैक्षणिक अर्हता धारण करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी देण्यात येत असल्याचे स्पष्ट करून कामगारांना न्याय दिला. हे सर्व “इंटक फेडरेशन”च्या प्रयत्नाने यशस्वी झाल्याची भावना पीडित कामगारांनी व्यक्त करून संघटनेचे अध्यक्ष मा. आ. भाई जगताप, मुख्य महासचिव प्रकाश गायकवाड आणि उपाध्यक्ष पंजाब देशमुख, चाळीसगाव यांचे आभार व्यक्त केले आहेत. जळगाव परिमंडळात १० ते १५ वर्षापासून बाह्यस्त्रोत कामगार म्हणून विनाअपघात सेवा बजाविणाऱ्या २५० ते ३०० कर्मचाऱ्यांना…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील ‘निसर्ग मित्र समिती’तर्फे प्रत्येकवर्षी शैक्षणिक, सामाजिक तसेच पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीही धुळे येथील पद्मश्री हॉल येथे पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संस्थापक-अध्यक्ष एस.एम.पाटील होते. याप्रसंगी भडगाव येथील सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय आणि सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वासराव साळुंखे (व्ही.एस.साळुंखे ) यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिक्षक आ.किशोर दराडे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षण संचालक गोविंद साहेब, निसर्ग मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे,…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी तथा जामनेर तालुक्यातील गोरनाळे येथील रहिवासी रमेश जाधव यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मदत व पुर्नवर्सन मंत्री ना.अनिल पाटील, आ.किशोर पाटील, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंटे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते ‘कृषी वैभव रत्न’ पुरस्काराने नुकतेच पाचोऱ्यातील भडगाव रस्त्यालगतच्या शक्तीधाम येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. पाचोरा उपविभागीय कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी जामनेर तालुक्यातील गोरनाळे येथील आपल्या शेतात विविध शेती पद्धतीचे बदलत्या हवामानास अनुकूल शेती पद्धती व पीकरचना शेतीचे मॉडेल स्वत: विकसित करुन शाश्वत शेतीसह झिरो मशागत, जैविक शेती, सेंद्रिय शेती अशा विविध १० शेती पद्धतींवर आधारीत एकाच शेती…
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत ध्येय करियर अकॅडमी संचालित जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या आय.एम. विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी कुऱ्हाडचे सरपंचपती डॉ.प्रदीप महाजन होते. महाराष्ट्र राज्यातून लाखो विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी बसलेले होते. ही परीक्षा १ ली ते ८ वी सेमी, मराठी व इंग्रजी माध्यमातून घेतली जाते. परीक्षेला कुऱ्हाड, नांद्रा, साजगाव, कुऱ्हाड तांडा, लाख तांडा या जिल्हा परिषद व इतर शाळेतील मुले परीक्षेस बसले होते. त्यामधून विहान संजय काळे ह्याने दुसरीमधून राज्यातून पहिला क्रमांक मिळविला. तसेच अक्षरा अशोक भिवसने…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील ओझर येथील २७ वर्षीय तरुणाचा गिरणा नदीतून जात असताना पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी, १० सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. प्रवीण चुडामण पाटील (वय २७, रा. ओझर, ता. पाचोरा) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्रवीण पाटील हे नेहमीप्रमाणे बाहेर शौचालयाला जात होते. त्याचवेळी ही घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. ओझर येथे असलेल्या गिरणा नदी पात्रातून अवैधपणे वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जातो. त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहे. अशाच एका खड्ड्यात प्रवीण पाटील बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा चर्चेतून सूर…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जून महिन्यातच धूळ पेरणीसह अल्प प्रमाणात झालेल्या पावसावर लाखो रुपयांची बियाणे निसर्गाच्या विश्वासावर शेतात टाकून जुगार खेळला होता. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात बळीराजाची पिके जिवंत राहील, अशा स्वरूपाचा रिमझिम पाऊस पडल्यामुळे पिके कशीतरी तग धरून होते. मात्र, त्यासोबतच शेतात तण (गवत) जोमाने वाढले होते. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पिकांपेक्षा गवताचीच जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे बळीराजाला निंदणीचा खर्च हा दुप्पट करावा लागला. त्यातच पावसाने दांडी मारल्याने बळीराजाने केलेला संपूर्ण खर्च वाया जातो की, काय? अशी परिस्थिती येऊन ठेपली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यावर वरुणराजाची कृपादृष्टी झाल्याने तालुक्यातील बळीराजा सुखावला आहे. तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला…