वीज कामगार फेडरेशन ‘इंटक’ संघटनेचा मोठा विजय

0
3

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय वीज कामगार फेडरेशनच्या ‘इंटक’ संघटनेचा मोठा विजय झाला आहे. तसेच बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या लढाईला अखेर यश मिळाले आहे. सर्वांचा परिपाक म्हणून वितरण प्रशासनाने पत्र क्र. २६४७५ दि.१ सप्टेंबर २०२३ नुसार कामगारांना शैक्षणिक अर्हता धारण करण्यासाठी ३ वर्षाचा कालावधी देण्यात येत असल्याचे स्पष्ट करून कामगारांना न्याय दिला. हे सर्व “इंटक फेडरेशन”च्या प्रयत्नाने यशस्वी झाल्याची भावना पीडित कामगारांनी व्यक्त करून संघटनेचे अध्यक्ष मा. आ. भाई जगताप, मुख्य महासचिव प्रकाश गायकवाड आणि उपाध्यक्ष पंजाब देशमुख, चाळीसगाव यांचे आभार व्यक्त केले आहेत.

जळगाव परिमंडळात १० ते १५ वर्षापासून बाह्यस्त्रोत कामगार म्हणून विनाअपघात सेवा बजाविणाऱ्या २५० ते ३०० कर्मचाऱ्यांना आयटीआय ही शैक्षणिक अर्हता धारण केलेली नसल्या कारणावरून कामावरून कमी केले होते. हवालदिल झालेल्या कर्मचाऱ्यांनी साधारण ४५ दिवस कार्यालयाच्या गेटवर आमरण उपोषण करूनही त्यांच्या पदरी निराशा आली. इंटक संघटनेचे मुख्य सचिव प्रकाश गायकवाड यांना कर्मचाऱ्यांची व्यथा समजताच त्यांनी संघटनेचे उपाध्यक्ष पंजाब देशमुख यांना उपोषणस्थळी जळगाव येथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदेशित केले. त्यांनी त्वरित आदेशाचे पालन करण्याकरीता सोबत इंटकचे योगेश देशमुख, चाळीसगाव आणि सुनील चव्हाण, मेहुणबारे यांना सोबत घेऊन उपोषणस्थळी भेट दिली. त्यानुसार कामगारांच्या हक्कासाठी इंटक फेडरेशनचे मा.आ.भाई जगताप यांच्या अध्यक्षतेखाली वेळोवेळी पत्रव्यवहार सुरु केला. त्याकरीता अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय यांच्याशी पत्रव्यवहार झाल्यानंतर मा. आ. भाई जगताप यांनी उर्जामंत्री यांच्याशी चर्चा करून संपर्क, पत्रव्यवहार केल्यानंतर जळगाव येथील कामगारासाठी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न मांडला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here