साईमत, जामनेर : प्रतिनिधी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर तालुक्यात ‘आयुष्यमान भव’ मोहिमेचा उपजिल्हा रुग्णालय येथे नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते फीत कापून नुकताच प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत महाजन, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.वैशाली महाजन, डॉ.नरेश पाटील, डॉ.मनोज पाटील, जळगाव येथील नेत्रविभाग, अस्थी विभाग, मानसोपचार तज्ज्ञ उपस्थित होते. तालुक्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘आयुष्यमान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेमध्ये अबाल वृद्धांच्या आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहे. ‘आयुष्यमान आपल्या दारी’ उपक्रमाद्वारे तालुक्यातील सर्व पात्र लाभार्थींची नोंदणी करून त्यांना आयुष्यमान गोल्डन कार्डचे वितरण करण्यात येणार…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी धकाधकीचे आयुष्य जगताना मन:शांती मिळणे दुरापास्त झाले आहे. मी एका कार्यक्रमानिमित्त येथे आली. त्यावेळी कळले की, येथे एक आगळेवेगळे व लौकिकप्राप्त श्री मंगळग्रह मंदिर आहे. मला आपसूकच मंदिराला भेट देण्याची इच्छा झाली. मी भेटही दिली आणि दर्शन, पूजा, महाआरती करण्याची संधीही मला मिळाली. त्यामुळे मनाला खूपच सकारात्मक शांती लाभली, असे भावोद्गार सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांनी काढले. श्री मंगळग्रह देवतेचे दर्शन घेण्यासाठी त्या १२ रोजी आल्या होत्या. तेव्हा त्या सेवेकऱ्यांशी बोलत होत्या. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रवींद्र मोरे, सेवेकरी भरत पाटील, मनोहर तायडे…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय येथ माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील यांनी भविष्याचा अभ्यास करून गेल्या ३५ वर्षापूर्वी महिलांसाठी अमळनेर तालुक्याच्या ठिकाणी एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ मुंबई संलग्न महिला महाविद्यालय सुरू केले होते. आज महिला महाविद्यालयाला प्रवेश मान्यता १२० विद्यार्थीची (एफवायबीए) असतांना १२० प्रवेश झाले आहेत. नंतर १५ विद्यार्थिनींना विद्यापीठाची परवानगी घेऊन प्रवेश द्यावे लागले. ही प्रवेशाची भरारी पाहून सर्वांनी प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. महाविद्यालयाला प्रवेशासाठी विद्यार्थिनींनी पहिली पसंती दिली आहे. विद्यार्थिनींचा कल कला शाखेकडे जास्त आहे. कारण कला शाखेत अनेक विषय मराठी,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरी भागात पुरणपोळी खाऊन पोळ्याचा सण साजरा केला जातो. मात्र, शेती, बैलाचे राबणे, पोळ्याला त्याची केली जाणारी सजावट याची मोबाईल युगातील विद्यार्थ्यांना फारशी माहिती नसते. त्याच पार्श्वभूमीवर पोळ्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी बैल सजावट साहित्याचे व्ही. एच. पटेल प्राथमिक विद्यालयात चित्र प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनाही चित्रप्रदर्शनातून बैलाची अनोखी सजावट अनुभवली. हा स्तुत्य उपक्रम उपशिक्षक जिजाबराव वाघ यांनी राबविला. उद्घाटन मुख्याध्यापिका मंजूषा नानकर यांच्या हस्ते झाले. ग्रामीण भागातील सण-उत्सव परंपरेसोबतच शेतीची मशागत करतांना लागणारे साहित्य प्राण्याची मदत याची माहिती शहरातील विद्यार्थ्यांना नसते. मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळेही सामान्यज्ञान, आजुबाजूच्या परिसराच्या माहितीचा त्यांच्यात अभाव जाणवतो. हे लक्षात घेऊनच पोळा…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी येथील पंकज ग्लोबल स्कूलमध्ये कबड्डीचे सामने नुकतेच पार पडले. कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील ३८ संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित माध्यमिक विद्यालयातील १४ वर्षे आतील मुलांचा संघ विजयी झाला आहे. त्यामुळे त्यांची जिल्हास्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड केली आहे. या संघाने तालुक्यातीलच धानोरा येथील झि. तो. महाजन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील संघास नमवून तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. संघाला क्रीडा शिक्षक अशोक साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप पाटील, उपाध्यक्षा आशा पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, संचालक मंडळ तसेच चोपडा तालुका क्रीडा समन्वयक रवींद्र आल्हाट,…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी दोन मुले असताना तिसरीही मुलगी झाली म्हणून बापाने नवजात अभ्रक मुलीला स्वतःजवळची तंबाखू तोंडात टाकून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात बापावर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, जामनेर तालुक्यातील वाकोद येथील हरी नगर तांडा येथे ३० वर्षीय तरुण हा आपल्या पत्नी व दोन मुलींसह वास्तव्याला आहे. यापूर्वी त्याला दोन मुली झाल्या. दरम्यान, तिसरे अपत्यही मुलगीच झाल्याचा राग मनात ठेवून नवजात अभ्रक मुलीच्या तोंडात तंबाखू भरून तिला झोक्यात टाकून ठार मारले. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचे मृतदेह गावाचे शेजारी असलेल्या नाल्याजवळ खड्ड्यात पुरून टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर येथील सूर्या फाउंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे ‘पोळा’ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे पटांगण सुंदर रांगोळी, सडा, फुलमाळ आदींनी सजविण्यात आले होते. यावेळी शाळेच्या चेअरमन अर्चना सूर्यवंशी, संचालक प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवठळ येथील प्रगतीशील शेतकरी गुलाब पाटील उपस्थित होते. पारंपरिक सणाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन लहान विद्यार्थ्यांनी पारंपरिक शेतकरी, नऊ वार साडीची आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. शाळेतील पालक मुकेश भागवत माळी यांनी स्वयंप्रेरणेने आपली खिल्लारी बैलजोडी सजवून शाळेत आणली. त्यांनी सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. यावेळी बैलजोडीचे पूजन करुन सालाबादप्रमाणे अर्चना सूर्यवंशी यांनी बैलजोडी सजविण्यासाठीचे नवीन साहित्य बैलजोडी मालकास…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी चोपडा रोटरी क्लब करत असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यासाठी प्रांतपाल आशा वेणूगोपाल, सहप्रांतपाल डॉ.राहुल मयूर यांनी रोटरी क्लब ऑफ चोपडा येथे नुकतीच भेट देत दिवसभर कामांची पाहणी केली. भेटीत प्रांतपाल, सह प्रांतपाल यांची रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष चेतन टाटीया, मानद सचिव अर्पित अग्रवाल, कोषाध्यक्ष पवन गुजराथी, रोटरी वर्ष २४ -२५ चे अध्यक्ष ईश्वर सौंदांणकर, मानद सचिव भालचंद्र पवार यांच्यासोबत रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या कामकाजाबद्दल बैठक घेतली. त्यात रोटरी क्लबच्या संचालकांनी आपापल्या क्षेत्रातील रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे करण्यात येणाऱ्या व झालेल्या प्रकल्पांबद्दल प्रांतपाल यांना माहिती दिली. यानंतर प्रांतपाल आशा वेणूगोपाल यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांना भेट दिली. समाज…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील सिग्नल चौक परिसरातील मोटारसायल चोरी झाल्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पथक नेमून दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले आहे. रात्रीच्या वेळी आणखी अशाच प्रकारचे गुन्हे घडू नये म्हणून रहिवाश्यांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या घरासमोरील लाईट सुरु ठेवावे. तसेच कॉलनीतील नागरिकांनी त्यांच्या कॉलनीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे आव्हान केले आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचे तसेच अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एक विशेष पथक तयार केले होते. त्यानंतर पथकातील अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस उपनिरीक्षक सुहास…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी आपल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी नेहमी चर्चेत असणारे जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्व.रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील १ हजार २०० अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वितरणाचा समारंभ मंगळवारी, १२ सप्टेंंबर रोजी दुपारी ४ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानात पार पडला. यावेळी राज्याचे ग्रामविकास व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांंच्याहस्ते गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट देण्यात आली. अध्यक्षस्थानी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक…