साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर
येथील सूर्या फाउंडेशन संचलित नोबल इंटरनॅशनल स्कूल येथे ‘पोळा’ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे पटांगण सुंदर रांगोळी, सडा, फुलमाळ आदींनी सजविण्यात आले होते. यावेळी शाळेच्या चेअरमन अर्चना सूर्यवंशी, संचालक प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून कवठळ येथील प्रगतीशील शेतकरी गुलाब पाटील उपस्थित होते.
पारंपरिक सणाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन लहान विद्यार्थ्यांनी पारंपरिक शेतकरी, नऊ वार साडीची आकर्षक वेशभूषा परिधान केली होती. शाळेतील पालक मुकेश भागवत माळी यांनी स्वयंप्रेरणेने आपली खिल्लारी बैलजोडी सजवून शाळेत आणली. त्यांनी सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले. यावेळी बैलजोडीचे पूजन करुन सालाबादप्रमाणे अर्चना सूर्यवंशी यांनी बैलजोडी सजविण्यासाठीचे नवीन साहित्य बैलजोडी मालकास भेट म्हणून दिले. तसेच नैवेद्यही दाखविला. पोळा सणाचे शेतकऱ्यांच्या जीवनातील बैलाचे महत्त्व व पोळा साजरा करण्यामागील उद्देश आणि माहिती चेतन सोनवणे यांनी दिली. यासाठी शाळेच्या अध्यक्षा अर्चना सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक, सांस्कृतिक विभाग प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.