चोपड्यात रोटरीच्या प्रांतपाल आशा वेणूगोपाल यांची भेट

0
2

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

चोपडा रोटरी क्लब करत असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यासाठी प्रांतपाल आशा वेणूगोपाल, सहप्रांतपाल डॉ.राहुल मयूर यांनी रोटरी क्लब ऑफ चोपडा येथे नुकतीच भेट देत दिवसभर कामांची पाहणी केली.

भेटीत प्रांतपाल, सह प्रांतपाल यांची रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष चेतन टाटीया, मानद सचिव अर्पित अग्रवाल, कोषाध्यक्ष पवन गुजराथी, रोटरी वर्ष २४ -२५ चे अध्यक्ष ईश्वर सौंदांणकर, मानद सचिव भालचंद्र पवार यांच्यासोबत रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या कामकाजाबद्दल बैठक घेतली. त्यात रोटरी क्लबच्या संचालकांनी आपापल्या क्षेत्रातील रोटरी क्लब ऑफ चोपडातर्फे करण्यात येणाऱ्या व झालेल्या प्रकल्पांबद्दल प्रांतपाल यांना माहिती दिली. यानंतर प्रांतपाल आशा वेणूगोपाल यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांना भेट दिली. समाज कार्य महाविद्यालयात प्रांतपाल यांच्या हस्ते सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनचे उद्घाटन करून ते रोटरी क्लब ऑफ चोपडाच्यावतीने कॉलेजला देण्यात आली. रोटरी भवनास भेट देऊन वृक्षारोपण करण्यात आले. डीवायएसपी ऋषिकेश रावले उपस्थित होते. याप्रसंगी डायलिसिस सेंटर, हळताळकर हॉस्पिटलला भेट देण्यात आली.

प्रांतपालांनी साधला संवाद

शहरातील आनंदराज पॅलेस येथे गेल्यावर्षी रोटरी क्लब ऑफ चोपडाला भेटलेल्या डिस्ट्रिक अवॉर्डचेही वितरण प्रांतपाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रांतपाल आशा वेणूगोपाल यांनी सर्वांसोबत संवाद साधत ड्रीम प्रोजेक्ट जसे बांबू लागवड दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ॲप प्रोजेक्ट आकांक्षा प्रोजेक्ट बूूंद तसेच रोटरीमार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा करण्याचे आवाहन मनोगतात केले. प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष चेतन टाटीया, सूत्रसंचालन गौरव महाले तर आभार मानद सचिव अर्पित अग्रवाल यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here