रुख्मिणीताई महाविद्यालयाला प्रवेशासाठी विद्यार्थिनींची पहिली पसंती

0
2

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय येथ माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील यांनी भविष्याचा अभ्यास करून गेल्या ३५ वर्षापूर्वी महिलांसाठी अमळनेर तालुक्याच्या ठिकाणी एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ मुंबई संलग्न महिला महाविद्यालय सुरू केले होते. आज महिला महाविद्यालयाला प्रवेश मान्यता १२० विद्यार्थीची (एफवायबीए) असतांना १२० प्रवेश झाले आहेत. नंतर १५ विद्यार्थिनींना विद्यापीठाची परवानगी घेऊन प्रवेश द्यावे लागले. ही प्रवेशाची भरारी पाहून सर्वांनी प्रशासकीय अधिकारी, प्राचार्य, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. महाविद्यालयाला प्रवेशासाठी विद्यार्थिनींनी पहिली पसंती दिली आहे.

विद्यार्थिनींचा कल कला शाखेकडे जास्त आहे. कारण कला शाखेत अनेक विषय मराठी, हिंदी, इतिहास, बालसंगोपन व इतर जनरल नॉलेजशी संबंधित विषय आहे. अश्ाा महाविद्यालयात पदवी घेतल्यास भविष्यात भारतातील सर्वोच्च परीक्षा एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी.मार्फत कलेक्टर, डीवायएसपी, प्रांत, तहसीलदार, पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस व क्लार्क अश्ाा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय पदावर कामाची संधी मिळते. म्हणून कला महाविद्यालयात प्रवेश घेतला असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here