साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरातील सिग्नल चौक परिसरातील मोटारसायल चोरी झाल्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पथक नेमून दुचाकी चोरट्याला ताब्यात घेतले आहे. रात्रीच्या वेळी आणखी अशाच प्रकारचे गुन्हे घडू नये म्हणून रहिवाश्यांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या घरासमोरील लाईट सुरु ठेवावे. तसेच कॉलनीतील नागरिकांनी त्यांच्या कॉलनीत सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे आव्हान केले आहे.
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचे तसेच अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी एक विशेष पथक तयार केले होते. त्यानंतर पथकातील अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक सागर ढिकले, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व पोलीस अंमलदार पो.ना. राहुल सोनवणे, महेंद्र पाटील, भूषण पाटील, पो.कॉ.आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, पवन पाटील, राकेश महाजन, पो.कॉ.समाधान पाटील, विजय पाटील, ज्ञानेश्वर पाटोळे यांनी गुन्ह्यातील आरोपीताचा कसुन शोध घेतला. तेव्हा विजय पाटील आणि भूषण पाटील यांना कजगाव, ता. भडगाव येथील एक अनोळखी संशयितरित्या मिळून आला. तसेच तो मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील सी.सी.टी.व्ही. फुटेजप्रमाणे मिळते-जुळते वर्णनाचे असल्याचा संशय बळावला. त्यामुळे त्यास ताब्यात घेवून अधिक चौकशी केली. तेव्हा त्याने त्याचे नाव मोहसिन शेख कादर मनियार (वय ३२, रा. कजगाव, ता. भडगाव) असे असल्याचे सांगितले. त्याने चाळीसगाव शहर पो.स्टे. गुरनं. ४४६/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्यातील २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरुन नेल्याची कबुली देवून मोटारसायकल काढून दिली. नमूद आरोपीतास नमूद गुन्ह्यात अटक केली आहे. तपास योगेश बेलदार, निलेश पाटील करीत आहेत.