साईमत, पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा डॉक्टर असोसिएशनतर्फे अद्भुत शांतता व निखळ आनंद देणारा प्रेरणादायी कार्यक्रम ‘लव यू जिंदगी’ अर्थपूर्ण जीवनासाठी ‘हृदय संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमानंतर पाचोरा डॉक्टर असोसिएशनची बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीची निवड खेळीमेळीच्या वातावरणात आणि बिनविरोध करण्यात आली. मावळत्या कार्यकारिणीतील अध्यक्ष दिनेश सोनार, चेअरमन डॉ.सुनील पाटील, उपाध्यक्ष डॉ.अतुल पाटील, सचिव नंदकिशोर पिंगळे, सहसचिव डॉ.हर्षल देव, खजिनदार डॉ.जीवन पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले होते. तसेच नूतन कार्यकारिणी जाहीर केली. नवीन कार्यकारिणीत डॉ.भरत पाटील चेअरमन तसेच अध्यक्षपदी डॉ.अतुल पाटील तर उपाध्यक्ष म्हणून डॉ.प्रवीण माळी यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत खजिनदारपदी डॉ.राहुल काटकर, सचिवपदी डॉ.हर्षल…
Author: Sharad Bhalerao
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील खेडगावला वंचित बहुजन आघाडीच्या पश्चिम शाखेच्या फलकाचे अनावरण नुकतेच उत्साहात करण्यात आले. जिल्हा प्रभारी रविकांत वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष विलास चव्हाण होते. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार उपस्थित होते. यावेळी तालुका महासचिव शरद धात्रक, तालुका उपाध्यक्ष हंसराज पगारे, शहराध्यक्ष सागर निकम यांच्यासह खेडगाव शाखेचे अध्यक्ष शत्रुघ्न केदार, उपाध्यक्ष कलीम सय्यद, गौतम केदार, नितीन केदार, शिवदास केदार, सलीम खाटीक, धर्मराज केदार, बापू केदार, शांताराम केदार, अमीन शेख, संजय केदार, आदनाम बागवान, संजय केदार, देविदास केदार, संजय खैरे, अमन शहा, सुरज केदार, रमेश केदार, मजर मन्यार, शाबीर…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी सामाजिक संघटना अपंग जनता दलाची पत्रकार शेख अनिस यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत संजय गांधी निराधार योजना तसेच विशेष बीज भांडवलवरही चर्चा करण्यात आली. यावेळी पाच टक्के निधी, अंत्योदय योजना आदी विषयांचाही आढावा घेण्यात आला. अपंग जनता दलाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी जळगाव जिल्ह्यातील संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला आनंद पाटील (राज्याध्यक्ष, नंदुरबार) भाऊसाहेब किसन दसपुते (राज्य संपर्कप्रमुख, जालना) जाकीर शेख (राज्य कार्याध्यक्ष, संभाजीनगर), कुसुम सुकासे (महिला राज्याध्यक्ष), रीना पाटील (महिला राज्य उपाध्यक्ष), कुणाल झाल्टे (राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय नाशिक), निलेश पाटील (जिल्हाध्यक्ष, जळगाव) देवेश दीपक पवार (जिल्हा उपाध्यक्ष, जळगाव)…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातीलवाकडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या सूचनेनुसार शनिवारी, १६ सप्टेंबर रोजी ‘आयुष्यमान भव’ आणि राष्ट्रीय पोषण अभियानाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी राऊत यांनी गरोदर मातांना आहार व गरोदरपणात घ्यावयाच्या काळजीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ‘आयुष्यमान भव’ ही मोहीम १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या काळात तर पोषण अभियान १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. अध्यक्षस्थानी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे होते. ‘आयुष्यमान भव’ योजनेंतर्गत पात्र लाभार्थींची नोंदणी करून आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड व आभा कार्ड…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित अमळनेर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डीवायएसपी सुनील नंदवाळकर होते. उद्घाटक म्हणून धनदाई संस्थेचे अध्यक्ष डी.डी.पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष तथा जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य के.डी पाटील, प्राचार्य प्रा. डॉ.अनिल पाटील आदी उपस्थित होते. कबड्डी स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटाच्या आतील मुलांच्या संघाने सहभाग घेतला. त्यात १० मॅचेस खेळविल्या गेल्या. त्यात ४९ संघ सहभागी झाले होते. अचानक पाऊस आल्याने मैदानात पाणी साचले म्हणून…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील दहिवद येथे पोळा सण साजरा करत असताना सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याची घटना गावातील महादेव मंदिराजवळ घडली. याप्रकरणी ११ जणांवर दंगलीचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे गुरुवारी, १४ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता पोळा सण साजरा करण्यासाठी बैल जोड्या आणण्यात आल्या होत्या. तेथे डीजेवर काहीजण नाचत असताना सरपंच देवानंद बहारे यांनी व्यवस्थित नाचा, असे सांगितले. त्यावेळी ज्याला रोजगार सेवक म्हणून ग्रामपंचायतमध्ये घेतले नाही, त्याने व त्याच्यासह ११ जणांनी त्यांना मारहाण केली. एकाने डोक्यात सळईने मारहाण केली तर एकाने हॉकी स्टिकने मारहाण केली. तसेच जातीवादी शिवीगाळ केली,…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी सण, उत्सव हे फक्त मौज, मस्तीसाठी साजरे करू नका तर सर्वांनी ते श्रद्धेने आणि एकोप्याने राहून साजरे करा. त्यात आपल्या परिवाराचा सक्रिय सहभाग घ्या. विसर्जन मिरवणुकीत डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर, शिक्षक, वकील, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांना सामील करून घ्या. त्यामुळे परिवारातून सामाजिक जाणीव आणि संस्कृतीची संकल्पना पुढे येईल आणि सर्व सण-उत्सव हे शांततेने साजरे होतील, असे विचार पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी व्यक्त केले. येथील वाणी मंगल कार्यालयात पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. अमळनेर शहरात १४२ मंडळ आहेत. त्यापैकी टप्प्याटप्प्याने गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. पाच दिवस, सात…
साईमत, एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पिंपळकोठा गावाजवळ खासगी लक्झरी बस उलटून अपघाताची घटना शनिवारी, १६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. त्यात एरंडोल ते जळगाव दरम्यान पिंपळकोठा गावाजवळ ३० प्रवासी असलेल्या स्लीपर लक्झरीचा अपघात झाल्याने चालकासह सहचालकाचा मृत्यू झाला. तसेच उर्वरित प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले होते. दरम्यान, यासंदर्भात एरंडोल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ती तातडीने सुरळीत केली. सविस्तर असे की, जळगाव ते एरंडोल दरम्यान असलेल्या पिंपळकोठा गावाजवळ चौधरी कंपनीच्या लक्झरी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी शहरातील श्रीरामपेठ येथील समाज बांधव, मित्र मंडळ, क्षेत्रीय माळी समाज, माळी गल्ली यांच्यावतीने सालाबादप्रमाणे बैल पोळा सण साजरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरातून बारा गाड्या ओढल्या जातात. प्रथम श्रीरामपेठ येथील बांधव आणि मित्र मंडळातर्फे बारा गाड्या ओढण्यात आल्या. त्या मम्मा देवी मंदिरापासून ते श्रीराम मंदीर श्रीरामपेठपर्यंत मोठ्या उत्साहात ओढण्यात आल्या. येथील क्षेत्रीय माळी समाज आणि मित्र मंडळ, माळी गल्ली आयोजित बारा गाड्या उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील पाचोरा रस्त्यावरील म्हसोबा मंदिरापासून राजमाता जिजाऊ चौक (नगर पालिका चौक) पर्यंत बारा गाड्या ओढण्यात आल्या. बारा गाड्या ह्या भरगच्च भाविकांनी भरलेल्या होत्या. यावेळी शहारातील भाविक भक्त, अबाल वृद्ध यांच्यासह तरुण…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत व्यवसाय आणि कौशल्य अभ्यासक्रमांची जागृती व्हावी या उद्देशाने धरणगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थेतर्फे रविवारी, १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता पीएम “रन फॉर स्किल” मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी होत असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चे २०० विद्यार्थी व ५० विद्यार्थिनी ह्या मॅरेथॉन स्पर्धेत स्पर्धक भाग घेणार आहेत. स्पर्धेत १६ वर्षाच्या पुढील मुले-मुली व स्त्री-पुरुष यात भाग घेऊ शकतात. स्पर्धेला कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. स्पर्धेची सुरूवात रविवारी सकाळी ७ वाजता शासकीय आय.टी.आय. पासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते परत शासकीय आय.टी.आय.पर्यंत…