पाचोरा तालुका डॉक्टर असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

0
3

साईमत, पाचोरा : प्रतिनिधी

पाचोरा डॉक्टर असोसिएशनतर्फे अद्भुत शांतता व निखळ आनंद देणारा प्रेरणादायी कार्यक्रम ‘लव यू जिंदगी’ अर्थपूर्ण जीवनासाठी ‘हृदय संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमानंतर पाचोरा डॉक्टर असोसिएशनची बैठक घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीची निवड खेळीमेळीच्या वातावरणात आणि बिनविरोध करण्यात आली. मावळत्या कार्यकारिणीतील अध्यक्ष दिनेश सोनार, चेअरमन डॉ.सुनील पाटील, उपाध्यक्ष डॉ.अतुल पाटील, सचिव नंदकिशोर पिंगळे, सहसचिव डॉ.हर्षल देव, खजिनदार डॉ.जीवन पाटील यांनी बैठकीचे आयोजन केले होते. तसेच नूतन कार्यकारिणी जाहीर केली.

नवीन कार्यकारिणीत डॉ.भरत पाटील चेअरमन तसेच अध्यक्षपदी डॉ.अतुल पाटील तर उपाध्यक्ष म्हणून डॉ.प्रवीण माळी यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीत खजिनदारपदी डॉ.राहुल काटकर, सचिवपदी डॉ.हर्षल देव, सहसचिव डॉ.संकेत विसपुते, प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉ.बन्सीलाल जैन, डॉ.राहुल झेरवाल, सांस्कृतिक विभागाची जबाबदारी डॉ.वीरेंद्र पाटील, डॉ.योगेश इंगळे तसेच स्पोर्ट्‌स विभागाची जबाबदारी डॉ.तोसिफ पठाण, डॉ.सिद्धांत तेली यांच्याकडे देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here