अमळनेरला तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा

0
21

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित अमळनेर तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन अमळनेरचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी डीवायएसपी सुनील नंदवाळकर होते. उद्‌‍‍घाटक म्हणून धनदाई संस्थेचे अध्यक्ष डी.डी.पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष तथा जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य के.डी पाटील, प्राचार्य प्रा. डॉ.अनिल पाटील आदी उपस्थित होते.

कबड्डी स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटाच्या आतील मुलांच्या संघाने सहभाग घेतला. त्यात १० मॅचेस खेळविल्या गेल्या. त्यात ४९ संघ सहभागी झाले होते. अचानक पाऊस आल्याने मैदानात पाणी साचले म्हणून उर्वरित सामने पुढे ढकलले आहे. हवामानाचा अंदाज घेऊन सामने खेळविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यांची होती उपस्थिती

यावेळी अमळनेर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष एस.पी.वाघ, विजय बोरसे, महेश माळी, निलेश विसपुते तसेच क्रीडा शिक्षक एस.आर.जाधव, प्रा.शैलेश पाटील, के.बी.पाटील, प्रा.पी.पी तुरणकर आदी उपस्थित होते. पंच म्हणून क्रीडा शिक्षक बाबुराव सांगोरे, स्वप्नील पाटील, एस.आर.जाधव, पंकज पाटील, विनोद पाटील यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी अमळनेर तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here