Author: Sharad Bhalerao

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील चिलगाव येथील महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जामनेर तालुक्यातील चिलगाव येथे गटारीतील कचरा काढण्याच्या कारणावरून एका ३९ वर्षीय महिलेला गावातील गोपाल सुरेश पाटील याने चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी घडली होती. तसेच महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात घेवून तक्रार दिली. या तक्रारीवरून शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे करीत आहे.

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद जळगावद्वारा आयोजित जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. त्यात मंगरूळ येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूल येथील १४ वर्षाच्या आतील मुली या गटातील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांची विभागीय स्तरावर निवड केली आहे. याबद्दल सर्व खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जाईस, उपमुख्याध्यापिका सिस्टर सिन्सी, मॅनेजर मदर अर्चना, यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. सर्व खेळाडूंचे शाळेचे क्रीडा शिक्षक कमलेश मोरे, किरण शिंपी, हॉकी संघाचे कोच कविता पाटील, भावना गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. विभागीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंची नावे अशी-…

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील खेडी सीम(प्र.ज) येथील पोलीस पाटील समाधान पाटील यांचा गु्रप ग्रामपंचायत, जनसुराज्य ग्रामविकास मंडळ, राजमुद्रा अभ्यासिका यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सत्कार केला. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे मा. सभापती शाम अहिरे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे, भाजपचे अमळनेर उपतालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, खेडीच्या प्रथम नागरिक आशा पाटील, उपसरपंच शोभा पाटील उपस्थित होते. यावेळी सर्वं संस्थेचे पदाधिकारी, ग्रा.पं.चे सरपंच, सदस्य, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, मान्यवरांच्या हस्ते पोलीस पाटील समाधान पाटील यांचा भव्य सत्कार करून गौरविण्यात आले. समाधान पाटील यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पोलीस पाटीलच्या परीक्षेत शंभर पैकी ८८ टक्के गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम…

Read More

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर एरंडोल येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यात लोहारा येथील डॉ. जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यात मुलींमध्ये १४ वर्षाच्या वयोगटात ३३ किलो वजन गटात मोनाली रमेश कोळी हिला रजत पदक द्वितीय क्रमांक तर मुलांमध्ये ५२ किलो वजन गटात ऋषिकेश दीपक चौधरी याने रजत पदक द्वितीय क्रमांक मिळविला. विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतिश काशीद, सहसचिव दीपक गरुड, संस्थेच्या महिला संचालिका उज्ज्वला काशीद, वस्तीगृहाचे सचिव कैलास देशमुख, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भीमराव शेळके तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके यांनी संस्थेच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांना…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव येथील ला.ना. हायस्कूल येथे नुकत्याच जिल्हाक्षेत्र नेटबॉल स्पर्धा पार पडल्या. त्यात जिल्हा क्षेत्रातून १४ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत वाघळी यशवंत पब्लिक स्कूलचे चार संघ सहभागी झाले होते. त्यात मुलींचा एक संघ विजयी तर तीन संघ उपविजेते ठरले. विजयी संघाची विभागस्तरीय निवड करण्यात आली. यशवंत पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री सूर्यवंशी यांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेला क्रीडा अधिकारी मीनल थोरात, जळगाव जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे सचिव प्रमोद पाटील, नेटबॉलचे प्रशिक्षक योगेश पांडे, ला.ना.हायस्कूलचे क्रीडा शिक्षक उल्हास ठाकरे, श्री.जगताप, खुशाल देशमुख, जे.पी.वाघ, विनय काळे, प्रकाश महाजन,धना भोळे आदी उपस्थित होते.

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील महाविद्यालयातील इंग्रजी विभागाने विद्यार्थ्यांना रोजगार संबंधी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. ए.व्ही. काटे होते. कार्यशाळेला ६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कार्यशाळेत उपप्राचार्य डॉ. ए.व्ही. काटे यांनी विद्यार्थ्यांनी करिअरबद्दल अधिक जागरूक राहून आपले भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नरत रहावे, असे सांगितले. प्रास्ताविकात इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.आर.आर.बोरसे यांनी कार्यशाळेचा हेतू हा रोजगार मार्गदर्शन आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातील विविध स्पर्धामध्ये भाग घ्यावा आणि महाविद्यालयातील तासिकामध्ये नियमित हजर राहण्याचे आवाहन केले. कार्यशाळेत भुसावळच्या संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा.किशोर चौधरी यांचे व्याख्यान सादर झाले. त्यांनी इंग्रजी भाषेचे करिअर दृष्टीने महत्त्व सांगितले. तस ेच ‘पदव्युत्तर रोजगाराच्या विविध…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात १९ वर्षाच्या आतील मुलींच्या गटात जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुलीचा संघ उपविजयी ठरला. या संघास जळगाव शहरातील महापौर जयश्री महाजन, ॲड.केतन ढाके, जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, मोहसीन शेख यांच्या हस्ते उपविजयी ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. यासाठी क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले. १९ वर्ष आतील मुलीचा संघात…

Read More

साईमत, धानोरा, ता. चोपडा : वार्ताहर येथील यावल बसस्थानक परिसरातील सात दुकाने तर लक्ष्मी नगरातील एक बंद घर फोडले. याप्रसंगी धानोरा पोलीस पाटील यांनी पाहणी करुन अडावद पोलीस ठाण्यात सांगितले. परंतू पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून चोऱ्या झालेल्या ठिकाणी साधी पाहणी वा विचारपूस करण्याची तसदी घेतली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अडावद पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. सविस्तर असे की, यावल बसस्थानक परिसरातील अमरदीप गुजर यांचे सूर्यवंशी टी सेंटर, रावसाहेब पाटील यांचे सातपुडा कृषी केंद्र, राजेंद्र चौधरी यांचे कांचन प्रिंटर्स जनरल स्टोअर्स, अडावदकरांचे जनता फ्रुट कंपनी व…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील हरीनगर तांडा येथे तिसरी मुलगी झाली म्हणून पित्याने तोंडात तंबाखू कोंबून झोळीत टाकून आठ दिवसाच्या चिमुकलीचे प्राण घेतल्याची दुर्दैवी घटना जामनेर आरोग्य विभागाच्या उत्कृष्ट कामकाजामुळे उघड झाली होती. या घटनेची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेऊन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन भायेकर यांच्यामार्फत निरोप देऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, वाकोद प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप कुमावद, आरोग्य सहाय्यिका निर्मला कुमावत, गटप्रवर्तक यमुना चौधरी-पाटील, आशा स्वयंसेविका मंगला जाधव, वाहन चालक विजु पांढरे अशा जामनेरच्या टीमला बोलावून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून स्वतः ‘अग्निपंख’ हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी जळगावचे आ.सुरेश भोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, मानस विकार…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भास्कराचार्य औद्योगिक प्रशिक्षिण संस्था तरवाडे येथे शैक्षणिक वर्ष २०२३ मधील प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित केला होता. सुरुवातीला सरस्वती मातेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्यावतीने सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कैलास सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या संचालिका जयश्री सूर्यवंशी, सौ.घाडगे, संस्थेचे सचिव आदित्य सूर्यवंशी, प्रवीण देवरे, शिवदास माळी, श्री.वाघ, श्री.ठाकरे, श्री.सूर्यवंशी, श्रीमती चौधरी यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सी.एस.महाजन यांनी केले.

Read More