जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत लोहारा विद्यालय द्वितीय ठरले

0
4

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

एरंडोल येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यात लोहारा येथील डॉ. जे.जी.पंडित माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. त्यात मुलींमध्ये १४ वर्षाच्या वयोगटात ३३ किलो वजन गटात मोनाली रमेश कोळी हिला रजत पदक द्वितीय क्रमांक तर मुलांमध्ये ५२ किलो वजन गटात ऋषिकेश दीपक चौधरी याने रजत पदक द्वितीय क्रमांक मिळविला.

विद्यालयाच्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन संजय गरुड, सचिव सतिश काशीद, सहसचिव दीपक गरुड, संस्थेच्या महिला संचालिका उज्ज्वला काशीद, वस्तीगृहाचे सचिव कैलास देशमुख, स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष भीमराव शेळके तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.चिंचोले, उपमुख्याध्यापिका यु.डी.शेळके यांनी संस्थेच्यावतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आर.जी.बैरागी, पी.एम.पाटील यांचेही कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here