जातीवाचक शिवीगाळ करत विवाहितेचा विनयभंग

0
3

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील चिलगाव येथील महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जामनेर तालुक्यातील चिलगाव येथे गटारीतील कचरा काढण्याच्या कारणावरून एका ३९ वर्षीय महिलेला गावातील गोपाल सुरेश पाटील याने चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी घडली होती. तसेच महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत विनयभंग केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात घेवून तक्रार दिली. या तक्रारीवरून शुक्रवारी, १५ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here