मंगरुळातील सेंट मेरीच्या हॉकी संघाची विभागीय स्तरावर निवड

0
3

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद जळगावद्वारा आयोजित जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. त्यात मंगरूळ येथील सेंट मेरी इंग्लिश मीडियम हायस्कूल येथील १४ वर्षाच्या आतील मुली या गटातील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांची विभागीय स्तरावर निवड केली आहे. याबद्दल सर्व खेळाडूंचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर जाईस, उपमुख्याध्यापिका सिस्टर सिन्सी, मॅनेजर मदर अर्चना, यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. सर्व खेळाडूंचे शाळेचे क्रीडा शिक्षक कमलेश मोरे, किरण शिंपी, हॉकी संघाचे कोच कविता पाटील, भावना गुजर यांचे मार्गदर्शन लाभले.

विभागीय स्तरावर निवड झालेल्या खेळाडूंची नावे अशी- वैष्णवी पाटील, नेहा वाल्हे, अमृता पाटील, अनन्या पाटील, प्रांजल पाटील, दिशा महाजन, तेजश्री साळुंखे, गुणगुण चव्हाण, श्रावणी पाटील, प्राची खैरनार, ज्ञानदा पाटील, कस्तुरी रोडगे, याशवी पाटील, नव्या पवार, रिद्धी बडगुजर, तनिष्का जाधव, तन्वी चौधरी, हिरण्या गुरव यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here