साईमत, जामनेर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात १९ वर्षाच्या आतील मुलींच्या गटात जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुलीचा संघ उपविजयी ठरला. या संघास जळगाव शहरातील महापौर जयश्री महाजन, ॲड.केतन ढाके, जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, मोहसीन शेख यांच्या हस्ते उपविजयी ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. यासाठी क्रीडा शिक्षक प्रा.समीर घोडेस्वार यांचे मार्गदर्शन लाभले.
१९ वर्ष आतील मुलीचा संघात नेहा देशमुख, पूर्वा सोनवणे, जयश्री इंगळे, प्रियंका माळी, सुवर्णा चव्हाण, गीतांजली शिंदे, निकिता माळी, नंदिनी बुंदेले, शितल चोपडे, वैशाली माळी, अश्विनी ठाकरे, दिव्या माळी, भाग्यश्री माळी, आशा वाघ, प्रतीक्षा साळवे या खेळाडूंचा समावेश होता.
सर्व खेळाडूंचे इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, मुख्याध्यापक एस.आर.चव्हाण, उपमुख्याध्यापक एस.एन.चवरे, उपप्राचार्य प्रा.के.एन.मराठे, पर्यवेक्षक प्रा.के.डी.निमगडे, क्रीडा विभाग प्रमुख जी.सी.पाटील, गजानन कचरे यांनी कौतुक केले.