साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील घाटरोड, नागदरोड, मालेगाव रोड, धुळे रोड, भडगाव रोड तसेच अनेक भागातील काही भंगार व्यावसायिक जुने टायर विक्रेते जुनी टायर खरेदी करून भंगार भावात विक्रीसाठी टायर जमा करून विकत आहे. त्याआधी हे व्यावसायिक टायर एकत्र जमा झाल्यानंतर ते ट्रकभर जमा होतील तोपर्यंत ही जुनी टायर जमवितात. तोपर्यंत त्या टायरमध्ये पाणी जमा होऊन त्यापासून दुर्गंधी तयार होते. रोगराई पसरण्यासाठी डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, ताप अश्ाा अनेक आजारांना निमंत्रण देण्यासाठी जुने टायरमध्ये जमलेले पाणी कारणीभूत तर नसावे? अशी भीती परिसरातील नागरिकांनी दै. ‘साईमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली आहे. याकडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्यविभाग का दुर्लक्ष करत असतील याबाबतही चर्चा होतांना…
Author: Sharad Bhalerao
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी शहरात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाचोरा नगरपरिषदेने स्वच्छता मोहिमेला गती दिलेली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठा, सरकारी कार्यालये, रेल्वे स्टेशन परिसर, शहरातील मुख्य चौक आदी ठिकाणी शनिवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांच्यामार्फत स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. यापुढेही अशीच मोहीम सुरु राहणार असल्याचे मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी सांगीतले. यावेळी शहरातील के.एम.बापू परिसरातील भाजी मंडीतील साचलेला कचरा, नगरपालिका कार्यालय परिसर, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर तसेच शहरातील इतर व्यापारी संकुल परिसरातून छोट्या हातगाड्याद्वारे कचरा गोळा करुन ट्रॅक्टरद्वारे उचलण्यात आला. तसेच व्यापारी संकुल परिसरातील भाजीपाला व्यापारी, हॉटेल व्यावसायिक व दुकानदार यांना उघड्यावर…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील पाटीलवाड्यातील रहिवाशी तथा ह.भ.प. अभिमान भावराव पाटील (ए.बी. पाटील) यांना नुकतेच ‘राष्ट्रीय समाज सेवा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहरातील पाटीलवाडा खोल गल्ली येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त झालेल्या एका कीर्तनात दिल्ली येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन संस्थेचे राष्ट्रीय सचिव ह.भ.प. वाल्मीक महाराज (सटाणा) यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना संस्थेतर्फे दरवर्षी वितरित करण्यात येतो. येथील ह.भ.प. अभिमान भावराव पाटील (ए.बी. पाटील) हे अनेक वर्षांपासून चाळीसगावसह परिसरात वारकरी संप्रदाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. त्यांच्या कार्याची दखल दिल्ली येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन संस्थेने घेऊन त्यांना…
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी शहरासह परिसरात १०६ मंडळांनी नवरात्रोत्सवात घटस्थापनेसह देवी मातेच्या मूर्तीची स्थापना केली होती. यापैकी काहींनी बुधवारी तर काही मंडळांनी गुरुवारी सवाद्य मिरवणुकीने देवी मातेच्या मुर्तींचे उत्साहात विसर्जन केले. यावेळी शांततेसाठी पोलिसांनी महत्त्वाची भुमिका निभावली. वरणगाव शहरासह परिसरात ३८ सार्वजनिक तर ६८ खासगी नवरात्र उत्सव मंडळांनी घटस्थापनेसह देवी मातेच्या मुर्तींची स्थापना केली होती. या मंडळापैकी बुधवारी ३५ तर गुरुवारी ७१ मंडळानी भक्ती भावाने तसेच उत्साहाने देवी मातेच्या मुर्तींचे हतनूर धरण नदीपात्रात विसर्जन केले. विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांनी पारंपरीक वाद्ये, लेझीम पथक, बॅन्ड पथक तसेच डिजेचा समावेश केला होता. मिरवणुकीत तरुणींनीही सहभाग नोंदवून स्वरक्षणार्थ चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखविली. विसर्जन…
साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज रहावे, असे आवाहन महाराष्ट्राचे ए.आय.एम.आय.एम.चे अध्यक्ष सय्यद मोईन यांनी केले. कासोदा येथील आयोजित ए.आय.एम.आय.एम.च्या जाहीर सभेत ते बोलत होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकजुटीने राहून येणाऱ्या निवडणुकीत आपला झेंडा लावावा, असे आव्हान करून सध्याच्या देशाच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला. सभेत मुजाहिद गाजी, कासोदा, रेहान जागीरदार जळगाव, अहमद सर जळगाव, सानिर सय्यद जळगाव यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी एरंडोलचे तालुकाध्यक्ष शाकीर सर, कासोदा शहराध्यक्ष हाजी इत्याक अली, समीर मुल्लाजी, मोहसीन खान, बशीर शेख, सोहेल शेख, शाहिद शेख, वाहिद खान, आसिफ भाई, मोसिन रजा आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील हिंगोली गावातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याची घटना रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुरुवारी, २६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील हिंगोली गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पीडित मुलगी झोपलेली होती. तेव्हा अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत पोस्ट लावून पळून नेत अपहरण केल्याची घटना घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार…
साईमत, लोहारा, ता पाचोरा : वार्ताहर येथील ज्येष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा दर रविवारी घेण्यात येते. रविवारी झालेल्या सभेचे नेतृत्व मात्र ज्येष्ठ महिलांनी आपल्या हाती घेतले. साप्ताहिक सभेला ६० ज्येष्ठ नागरिक महिला आणि ५१ ज्येष्ठ नागरिक पुरुष उपस्थित होते. सभा महिलांनी उत्कृष्ट, शांततेत चालवली. व्यासपीठावर १० महिलांना स्थान देण्यात आले होते. सभेची सुरुवात पूज्य साने गुरुजी रचित प्रार्थना ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ने झाली. सभेचे सूत्रसंचालन आशा रामचंद्र काळे यांनी केले. त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची गरज आणि महत्त्व विशद केले. कमलाबाई काकडे यांनी विचार प्रकट करून भजन गायले. इंदुबाई जाधव यांनी श्रीकृष्णाची बोधकथा सांगितली. अंजनाबाई जाधव यांनी…
साईमत, लोहारा, ता पाचोरा : वार्ताहर येथील तुकाराम आनंदा माळी पतसंस्थेचे सभासद भिका कुंभार यांच्या मुलीला किडनीच्या आजाराने त्रस्त केले आहेे. त्यामुळे त्यांना चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांनी पतसंस्थेमार्फत सभासद कल्याण निधीतून दहा हजार रुपयांचा धनादेश देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे चेअरमन डॉ.सुभाष घोंगडे यांच्या दातृत्वचे सर्वत्र कौतुक होत आहे. संस्थेचे सभासद भिका कुंभार हे सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यांची लहान मुलगी पूनम भिका कुंभार हिला किडनीच्या आजाराने त्रस्त केले आहे. त्यामुळे त्यांना आठवड्यातून दोन वेळेस डायलिसिस करावे लागत आहे. यासाठी ते आर्थिक संकटातून जात आहेत. आपला सभासद संकटात असल्याने त्याला आपल्या परीने थोडा फार का होईना हातभार लावावा, या…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील मुसळी गावात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन भावांना फायटर आणि दुचाकीच्या ब्रेकच्या वायरने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, धरणगाव तालुक्यातील मुसळी येथे भारत भागवत ठाकरे (वय २८) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती व मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी, २२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भारत ठाकरे हा त्याचा भाऊ किशोर ठाकरे यांच्या सोबत घरी बसलेले होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून प्रवीण बुधा सोनवणे, संदीप बुधा सोनवणे, अजय…
साईमत, धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील हनुमंतखेडे येथे किरकोळ कारणावरून एकाने दारूच्या नशेत वृध्द महिलेच्या डोक्यात लोखंडी कोयता मारून दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी बुधवारी, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, शांताबाई मंगल पवार (वय ६०, रा. हनुमंतखेडा ता.धरणगाव) ही वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावात राहणारा सुकदेव गोपाल सोनवणे हा तिथे आला. दारूच्या नशेत त्याने ‘माझी पत्नी तुमच्या घरात आहे का’, अशी विचारणा केली. त्यावरून त्याला वृध्द महिलेने माझ्या घरात नसल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने सुकदेव सोनवणे याने लोखंडी कोयता वृध्द…