आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सज्ज रहावे

0
2

साईमत, कासोदा, ता.एरंडोल : वार्ताहर

आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सज्ज रहावे, असे आवाहन महाराष्ट्राचे ए.आय.एम.आय.एम.चे अध्यक्ष सय्यद मोईन यांनी केले. कासोदा येथील आयोजित ए.आय.एम.आय.एम.च्या जाहीर सभेत ते बोलत होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एकजुटीने राहून येणाऱ्या निवडणुकीत आपला झेंडा लावावा, असे आव्हान करून सध्याच्या देशाच्या परिस्थितीवर प्रकाश टाकला.

सभेत मुजाहिद गाजी, कासोदा, रेहान जागीरदार जळगाव, अहमद सर जळगाव, सानिर सय्यद जळगाव यांनी मनोगत व्यक्त केले. यशस्वीतेसाठी एरंडोलचे तालुकाध्यक्ष शाकीर सर, कासोदा शहराध्यक्ष हाजी इत्याक अली, समीर मुल्लाजी, मोहसीन खान, बशीर शेख, सोहेल शेख, शाहिद शेख, वाहिद खान, आसिफ भाई, मोसिन रजा आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन धुळे येथील निहाल अख्तर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here