जुनी टायर देताहेत रोगराई पसरण्याला आमंत्रण

0
9

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहरातील घाटरोड, नागदरोड, मालेगाव रोड, धुळे रोड, भडगाव रोड तसेच अनेक भागातील काही भंगार व्यावसायिक जुने टायर विक्रेते जुनी टायर खरेदी करून भंगार भावात विक्रीसाठी टायर जमा करून विकत आहे. त्याआधी हे व्यावसायिक टायर एकत्र जमा झाल्यानंतर ते ट्रकभर जमा होतील तोपर्यंत ही जुनी टायर जमवितात. तोपर्यंत त्या टायरमध्ये पाणी जमा होऊन त्यापासून दुर्गंधी तयार होते. रोगराई पसरण्यासाठी डेंग्यू, मलेरिया, टायफाईड, ताप अश्ाा अनेक आजारांना निमंत्रण देण्यासाठी जुने टायरमध्ये जमलेले पाणी कारणीभूत तर नसावे? अशी भीती परिसरातील नागरिकांनी दै. ‘साईमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली आहे.

याकडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्यविभाग का दुर्लक्ष करत असतील याबाबतही चर्चा होतांना दिसत आहे. त्यावर जळगाव, चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी लक्ष देतील का? यावर नगरपरिषद केव्हा कारवाई करेल? शहरात अनेक डेंग्यू, मलेरिया, तापाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जुने टायर व्यावसायिकवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here