ह.भ.प. ए.बी.पाटील ‘राष्ट्रीय समाज सेवा रत्न’ पुरस्काराने सन्मानित

0
1

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

येथील पाटीलवाड्यातील रहिवाशी तथा ह.भ.प. अभिमान भावराव पाटील (ए.बी. पाटील) यांना नुकतेच ‘राष्ट्रीय समाज सेवा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शहरातील पाटीलवाडा खोल गल्ली येथे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त झालेल्या एका कीर्तनात दिल्ली येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन संस्थेचे राष्ट्रीय सचिव ह.भ.प. वाल्मीक महाराज (सटाणा) यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना संस्थेतर्फे दरवर्षी वितरित करण्यात येतो.

येथील ह.भ.प. अभिमान भावराव पाटील (ए.बी. पाटील) हे अनेक वर्षांपासून चाळीसगावसह परिसरात वारकरी संप्रदाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. त्यांच्या कार्याची दखल दिल्ली येथील जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन संस्थेने घेऊन त्यांना ‘राष्ट्रीय समाज सेवा रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. संस्थेने भर कीर्तनात केलेल्या सन्मानाबद्दल ह.भ.प.ए.बी. पाटील यांनी संस्थेचे आभार मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ह.भ.प.ए.बी. पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here