साईमत, मलकापूर : प्रतिनिधी भरधाव खासगी बसने राष्ट्रीय महामार्गवर वडनेर भोलजीनजीक पुलाजवळ दुचाकीला जबर धडक दिली. त्यात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी, १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली. राष्ट्रीय महामार्गावर वडनेर गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर वडनेरजवळ एआर ०१.ज.७७४१ क्रमांकाच्या खासगी बसने एम एच २८ बीएस ७८२१ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. खासगी बसने धडक दिल्याने भीषण अपघात होऊन अपघातात दुचाकीवरील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतक जळगाव खान्देश जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी ओम साई फाउंडेशन व नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याबाबत घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशन रुग्णवाहिकासह घटनास्थळी पोहचून अपघात मृत…
Author: Sharad Bhalerao
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी शहरातील सप्तशृंगी कॉलनी, ओम दुर्गेश्वर महादेव मंदिर येथे बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर सम्राट बळीराजा महोत्सवास ना.अनिल पाटील यांनी उपस्थित राहून सम्राट बळीराजाचे पूजन केले. बलिप्रतिपदेच्या दिवशी ईडा, पीडा टाळून बळीराजाचे राज्य आणण्यासाठी आपले सरकार प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्वांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, जय अंबे मित्र मंडळ व तरुण कुढापा मित्र परिवाराने प्रबोधनात्मक, वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सम्राट बळीराजा लोकोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
साईमत, जामनेर : प्रतिनिधी गरीबीमुळे दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहणाऱ्या घटकांपर्यंत पोहचण्याचा एक छोटासा प्रयत्न जामनेर पंचायत समितीच्या माजी सभापती निता पाटील आणि माजी सरपंच कमलाकर पाटील हे गेल्या काही वर्षापासून हा उपक्रम राबवित आहे. पाटील कुटुंबीय व मित्रपरिवार हे आदिवासी भिल्ल बांधवांना मिठाई, कपडे, साडी व इतर वस्तू देऊन आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदाही त्यांनी अशीच दिवाळी साजरी केली. लहान मुलांना कपडे व मिठाई भेट देऊन एक आदर्श समाजसमोर कायम ठेवला आहे. मुलांना नवीन कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला. यावेळी पाळधीचे सरपंच प्रशांत बाविस्कर, ग्रा.पं.सदस्य. देवचंद परदेशी, मनोज नेवे, सुमनबाई माळी, दीपक माळी, संदीप सुशीर, सोपान सोनवणे, नाना…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी शहरातील महावीर नगर परिसरातील साईनाथ महेश्वर महादेव मंदिराला दातृत्वशाली व्यक्तीमत्व राजेंद्र यशवंत बडगुजर यांनी डिजीटल एलईडी बोर्ड भेट देऊन भक्तगणांच्या मनात आदर्श निर्माण केला आहे. मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जेडीसीसी बँकेच्या माजी संचालिका इंदिरा पाटील, श्रीमती सुमन बडगुजर यांच्या हस्ते हस्ते डिजिटल बोर्ड फलक अनावरण करण्यात आले. डिजिटल बोर्डासाठी पुणे येथील मधुरा इंटेरिअर अँड कन्स्ट्रक्शन फर्मचे योगदान दिले आहे. यावेळी राजेंद्र बडगुजर, सुनील बडगुजर औरंगाबाद, विनोद बडगुजर, पत्रकार महेश शिरसाठ, पत्रकार लतीष जैन, फुलचंद चौधरी, कैलास बडगुजर, संदीप सावडळे, रवींद्र बडगुजर, श्रीराम बडगुजर शिंदखेडा, संजय बडगुजर शिंदखेडा, गौरेश बडगुजर, विनोद पाटील, सुनील महाराज, संजय जोशी, ऋषिकेश…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रांजणगावसह पंचक्रोशीचे आराध्य दैवत सद्गुरू माधवगिरी महाराज यांच्या संजीवन समाधीचा यात्रोत्सव शुक्रवारी, १७ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. त्यामुळे यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यानिमित्त गेल्या १० नोव्हेंबरपासून भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते. तसेच गुरुवारी, १६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता ह.भ.प.पांडुरंग महाराज मालपूरकर (दोंडाईचा) यांचे जाहीर कीर्तन झाले. यात्रोत्सवाच्या दिवशी म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ११ कावड मिरवणूक होईल. सकाळी ९ ते ११ ह.भ.प.वसंत महाराज धनगर यांचे काल्याचे कीर्तन होईल. ११.३० ते १२ महाआरती, महाआरतीनंतर दर्शनाला सुरवात होईल. यानंतर दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन केले आहे. ह्या वर्षीचे अन्नदान बाळासाहेब पंडितराव चव्हाण, प्रमोद…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ हे माणुसकी जपणारे व्यक्तीमत्त्व आहे. ते सर्वांना प्रेमाने वागणूक देतात. त्यांच्यातील माणुसकीचा दिवाळीनिमित्त एक प्रत्यय जनतेला आला. दिवाळी ही आगळीवेगळी साजरी करण्याच्या संकल्पनेतून त्यांनी पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेचे योगेश महाराज यांच्या शाळेतील अनाथ, गरजू, मूकबधिर मुला-मुलींना भेटून त्यांच्यासोबत चर्चा केली. दिवाळीचे फटाके फोडून तसेच मुलांना मिठाईचे वाटप करुन दिवाळी साजरी केली. त्यांच्या माणुसकीला मुलांनीही साद दिली. यावेळी त्यांनी मुलांसाठी काही मदत व सहकार्य असल्यास केव्हाही सांगा मी मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, पोलीस कर्मचारी समीर पाटील, सुनील पाटील, राहुल…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयाच्यावतीने नायब तहसीलदारांनी कार्यालयाला सुट्टी असतानाही माणुसकीचे नाते जपत अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला वैद्यकीय मदतीसाठी तात्काळ लागणारा उत्पन्नाचा दाखला दिल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानले आहेत. योगेश संजय पवार यांचा १५ दिवसांपूर्वी अपघात झाला होता. झालेल्या अपघातात मेंदुला जबर मार लागल्यामुळे त्यांना नाशिक येथील सोपान रुग्णालयात भरती केले होते. त्यांची परिस्थिती साधारण असल्याने त्यांच्या उपचाराचा खर्च कुटुंब करु शकत नसल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी मिळावा, म्हणून मंत्रालयात फाईल दाखल केली होती. मात्र, त्यात उत्पन्नाचा दाखला नसल्यामुळे फाईल निधी वाचुन प्रलंबित होती. याबाबत टाकळी प्र.दे.चे एकनाथ पवार यांनी ही बाब रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार यांना…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील सकल मराठा समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात सम्राट बळीराजा यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सम्राट बळीराजा यांनी शेतकरी कष्टकऱ्यांचे राज्य निर्माण केले. कर्मकांडांना विरोध केला, म्हणून वामन बटूने त्यांना छळ, कपटाने याच मातीत गाडले. परंतु बळीचे राज्य हवे असेल, इडा, पिडा टाळायची असेल तर आम्हाला आपले सण, आपले महापुरुषांचे विचार जपले पाहिजेत, असे प्रा.चंद्रकांत ठाकरे यांनी सम्राट बळीराजा यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमा पूजन प्रसंगी सांगितले. यावेळी ए.बी.मोरे यांनी बळीराजाविषयी माहिती विशद केली. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, भरत नवले, शहर कार्याध्यक्ष प्रदीप मराठे, राजेंद्र…
साईमत, भडगाव : प्रतिनिधी येथील श्री दत्त संस्थान उर्फ अवधूत मठी येथे दीपोत्सवाचे आयोजन केले होते. गुरुभक्त भिका गंगाराम पाटील यांच्या हस्ते दीपोत्सवाचे दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी संस्थांच्या प. पू. लतामाई अवधूत दातार, आसावरी दातार भडगावचे माजी नगरसेवक विजयकुमार देशमुख, डॉ.ईश्वरसिंग परदेशी, विजयकुमार देशपांडे, डॉ.दीपक मराठे, डॉ.दुर्गेश रुले, मोरेश्वर पाटील, अवधूत पाटील, विलास चौधरी, उद्धव झांबरे, रंजना महाजन आदींसह भक्तमंडळी उपस्थित होते. पंधरा वर्षांपूर्वी संस्थेचे अध्यक्ष मिलिंद महाराज दातार यांनी सुरू केलेली परंपरा आजही सुरू आहे. गेल्या १५ वर्षापासून अवधूत मठीत दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. उत्सवासाठी जळगावसह इतर जिल्ह्यातूनही भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यंदाही दीपोत्सव दिवसाचे आयोजन…
साईमत, भुसावळ : प्रतिनिधी शहरातील हनुमान नगर भागात शिवसेना (उबाठा) शाखेचे उद्घाटन नगराध्यक्षा माधुरी फालक यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी शहर प्रमुख दीपक धांडे यांनी माजी तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक निळू फालक(पंची) यांच्या कार्याचा उजाळा दिला व येणाऱ्या काळात या भागातून शिवसेनेचा नगरसेवक निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. ढोलताशे आणि फटाक्यांच्या जल्लोषात शाखेच्या उद्घाटनासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी शाखेचे शाखा प्रमुख स्वप्नील धांडे, उप शाखा प्रमुख राजेश थोरात, यश फालक, वरद फालक, रोशन ढाके, शिवम चौधरी, गणेश चौधरी, सुशांत झोपे, सुजल फालक, देवेंद्र फालक, ओजस बोरोले, हर्षल अंबेकर, डॉ.योगेश फालक, प्रकाश फालक, सुभाष…