हनुमान नगरात शिवसेना उबाठा शाखेचे उद्घाटन

0
1

साईमत, भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील हनुमान नगर भागात शिवसेना (उबाठा) शाखेचे उद्घाटन नगराध्यक्षा माधुरी फालक यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी शहर प्रमुख दीपक धांडे यांनी माजी तालुका प्रमुख तथा माजी नगरसेवक निळू फालक(पंची) यांच्या कार्याचा उजाळा दिला व येणाऱ्या काळात या भागातून शिवसेनेचा नगरसेवक निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले. ढोलताशे आणि फटाक्यांच्या जल्लोषात शाखेच्या उद्घाटनासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी शाखेचे शाखा प्रमुख स्वप्नील धांडे, उप शाखा प्रमुख राजेश थोरात, यश फालक, वरद फालक, रोशन ढाके, शिवम चौधरी, गणेश चौधरी, सुशांत झोपे, सुजल फालक, देवेंद्र फालक, ओजस बोरोले, हर्षल अंबेकर, डॉ.योगेश फालक, प्रकाश फालक, सुभाष फालक, मोहित फालक, रामदास पाटील, विवेक पाटील, मंगेश पाटील, दुर्गेश नेमाडे यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी भुसावळ शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख दीपक धांडे, ललित मुथा, बबलू बऱ्हाटे, पप्पू बारसे, दिलीप सुरवाडे, पिंटू भोई, मनोज पवार, शे.मेहमूद, शरद जोहरे, सोनी ठाकुर यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here