आदिवासी भिल्ल मुलांना कपड्यांसह मिठाईचे वाटप : पाळधीच्या पाटील कुटुंबीयांचा उपक्रम

0
10

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

गरीबीमुळे दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहणाऱ्या घटकांपर्यंत पोहचण्याचा एक छोटासा प्रयत्न जामनेर पंचायत समितीच्या माजी सभापती निता पाटील आणि माजी सरपंच कमलाकर पाटील हे गेल्या काही वर्षापासून हा उपक्रम राबवित आहे. पाटील कुटुंबीय व मित्रपरिवार हे आदिवासी भिल्ल बांधवांना मिठाई, कपडे, साडी व इतर वस्तू देऊन आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करतात. यंदाही त्यांनी अशीच दिवाळी साजरी केली. लहान मुलांना कपडे व मिठाई भेट देऊन एक आदर्श समाजसमोर कायम ठेवला आहे. मुलांना नवीन कपडे मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.

यावेळी पाळधीचे सरपंच प्रशांत बाविस्कर, ग्रा.पं.सदस्य. देवचंद परदेशी, मनोज नेवे, सुमनबाई माळी, दीपक माळी, संदीप सुशीर, सोपान सोनवणे, नाना सुशीर, विनोद कोळी, किरण पाटील, संजय धोबी यांच्यासह वस्तीतील समाजबांधव उपस्थित होते.

सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु वंचितांच्या नशिबी अंधकार आहे. आपल्या ताटात भरपूर अन्न आहे. त्यातील एक घास वंचितांच्या मुखात भरविणे हे पुण्याचे काम असल्याचे पाळधीचे माजी सरपंच कमलाकर पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here