साईनाथ महेश्‍वर मंदिराला डिजिटल एलईडी बोर्डची भेट

0
1

साईमत, चोपडा : प्रतिनिधी

शहरातील महावीर नगर परिसरातील साईनाथ महेश्‍वर महादेव मंदिराला दातृत्वशाली व्यक्तीमत्व राजेंद्र यशवंत बडगुजर यांनी डिजीटल एलईडी बोर्ड भेट देऊन भक्तगणांच्या मनात आदर्श निर्माण केला आहे. मंदिराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जेडीसीसी बँकेच्या माजी संचालिका इंदिरा पाटील, श्रीमती सुमन बडगुजर यांच्या हस्ते हस्ते डिजिटल बोर्ड फलक अनावरण करण्यात आले. डिजिटल बोर्डासाठी पुणे येथील मधुरा इंटेरिअर अँड कन्स्ट्रक्शन फर्मचे योगदान दिले आहे.

यावेळी राजेंद्र बडगुजर, सुनील बडगुजर औरंगाबाद, विनोद बडगुजर, पत्रकार महेश शिरसाठ, पत्रकार लतीष जैन, फुलचंद चौधरी, कैलास बडगुजर, संदीप सावडळे, रवींद्र बडगुजर, श्रीराम बडगुजर शिंदखेडा, संजय बडगुजर शिंदखेडा, गौरेश बडगुजर, विनोद पाटील, सुनील महाराज, संजय जोशी, ऋषिकेश भावे, सुरेखा महाजन, माधुरी बडगुजर, सरला बडगुजर, भारती बडगुजर, सरिता बडगुजर, भावना भावसार, रंजना बडगुजर, ममता चौधरी, मंजुषा कुलकर्णी, कविता भावसार, पूजा सिंधी, शितल महाजन आदी उपस्थित होते. यानंतर महाप्रसादाचा लाभ कॉलनी परिसरातील रहिवासींनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here