Author: Sharad Bhalerao

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी स्वराज्य पक्षाच्या बांधणीसाठी पाचोरा येथे नुकतीच स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी यांनी सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील, रमाकांत पवार, डॉ.योगेश पाटील यांच्यासह चाळीसगाव येथील रयत सेनेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश पवार यांची भेट घेऊन स्वराज्य पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी चर्चा केली. स्वराज्य पक्ष प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांचे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, सर्व सामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी स्वराज्य पक्षाच्यावतीने कार्य सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात स्वराज्य पक्षाचे काम वाढविण्यासाठी आपण नव्या उमेदीचे कार्यकर्ते तयार करून जळगाव जिल्ह्यात स्वराज्य पक्षाचे काम वाढविण्यासाठी कामाला लागून संभाजीराजे छत्रपती यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. केशव गोसावी यांच्या हजरजबाबीपणा आमच्या मनात घर…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी अत्यंत धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात खरा आनंद देणारा काळ कुठला असेल तर तो बालपणीचा काळ आहे. आपली शाळा, आपलं गाव, आपले मित्र, जर हा काळ ओलांडला तर उरतात फक्त आठवणी. म्हणून म्हणतात ना गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. या बालपणीच्या आठवणी जागविण्याची इच्छा असलेल्या पाळधी गावातील तरुणांनी प्रचंड मेहनत घेऊन शाळेतील जुन्या आठवणी जागविण्याच्या निमित्त सर्वांना एकत्र करून पुन्हा एकदा मैत्रीची शाळा त्याच जागेवर भरविली ती म्हणजे क.द.नाईक माध्यमिक विद्यालय, पाळधी. बालपणी निरागस असणारे चेहरे आज मात्र अनुभव पूर्ण होते आणि प्रेरणा देणारी होते. आपलेच मित्र आज इंजिनिअर, आदर्श शेतकरी, पोलीस, डॉक्टर, व्यावसायिक झालेला पाहून…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी येथील रेल्वे स्टेशन परिसरात अंगणात फटाके फोडण्याच्या कारणातून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी निलो शेख अंजू शेख (वय ३५, रा. आग्रा रोड, मालेगाव) ही महिला दिवाळीनिमित्त चाळीसगाव येथे वडिलांना भेटण्यास आली होती. १३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांची तसेच भावाची मुले घरासमोर अंगणात फटाके फोडत असतांना शेजारी राहणारे शेख गफ्फार शेख सत्तार याने ‘तुम्ही फटाके फोडू नका’, असे सांगत फिर्यादी यांच्या मुलास मारहाण केली. त्यावेळी फिर्यादीच्या भावाने शेख गफ्फार यास ‘माझ्या भाच्यास का मारले’, असे विचारल्याचा राग येवून गफ्फार शेख व त्याच्या नातेवाईकांनी एकत्र…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी समता सैनिक दलाचे मुख्य प्रचारक धर्मभूषण बागुल (चाळीसगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रचारक किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वात ‘गाव तेथे शाखा घर तेथे सैनिक अभियान’ अंतर्गत भडगाव तालुक्यातील बात्सर गावात समता सैनिक दलाची नुकतीच बैठक घेण्यात आली. याप्रसंगी उपस्थित तरुणांना समता सैनिक दलाचे ध्येय धोरण, ऐतिहासिक कार्य, महत्त्व व कामकाजाबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली. या भागातील जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असून लवकरच गाव शाखा कमिटी गठीत करण्यात येणार आहे. सभासद नोंदणी करणे, समता सैनिक दलाचा गणवेश तयार करणे असे अनेक मुद्दे ठरविण्यात आले. बैठकांचे आयोजन भडगाव तालुका प्रचारक विजय मोरे, रामजी जावरे, वाल्मिक मोरे, जनार्दन जावरे यांनी…

Read More

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथील अमोल रामदास साठे हा बावीस वर्षीय तरुण मोटरसायकलने कामानिमित्त जात असताना भडगावजवळ गेल्या नऊ दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. जखमी झालेल्या तरुणाला पाचोरा येथे दवाखान्यात दाखल केले होते. मात्र, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथे गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. तब्बल नऊ दिवस डॉक्टरांनी तरुणाला वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. मात्र, नीतीला ते मान्य नव्हते. अखेर शुक्रवारी,१७ नोव्हेंबर रोजी दुपारी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत अमोल साठे यांच्या पक्षात आई-वडील, दोन भाऊ, आजी, काका, काकू असा परिवार आहे.

Read More

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी भारतात सुरू असलेल्या वर्ल्ड कप क्रिकेटचा अंतिम सामना रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अंतिम सामन्याचे भव्य डिजिटल स्क्रीनवर थेट प्रक्षेपण जि. प.विश्रामगृह, अमळनेर येथे दाखविण्यात येणार आहे. अमळनेर येथील डॉक्टरांचे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए, अमळनेर), क्रिकेट शौकिनांचा ग्रीन अमळनेर ग्रुप आणि अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजन केले आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अतिशय फार्मात असलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचल्याने संपूर्ण भारतात अंतिम सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे. हा सामना अमळनेरकरांना सामूहिकरित्या पाहण्याचा आनंद देण्यासाठी आयोजन केले आहे. रविवारी, १९ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रक्षेपणास सुरूवात होणार…

Read More

साईमत, कजगाव, ता.भडगाव : वार्ताहर येथुन जवळील सार्वे, ता.पाचोरा येथे आणि डामरुण, ता.चाळीसगाव येथे शुक्रवारी, १७ नोव्हेंबर रोजी भरदिवसा सात घरे फोडत रोकडसह सोन्या-चांदीचा ऐवज चोरट्यांनी लांबवून पोबारा केला आहे. भरदिवसा झालेल्या चोऱ्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत चौकशी केली. पाचोरा तालुक्यातील सार्वे येथे भर दुपारी चारचाकीने आलेल्या चोरट्याने सुभाष विठ्ठल पाटील यांचे बंद घर फोडत काही रोकड रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबविले. तेथुन काही अंतरावरील भाऊसाहेब भिला पाटील यांचे तेथुन काही अंतरावरील काकासाहेब महादू पाटील यांचे घर फोडत घरातील कपाटातील सामान अस्तव्यस्त फेकत तेथुन पोबारा केला. ही घटना नगरदेवळा दुरक्षेत्राला कळताच पोलीस नाईक मनोहर पाटील,…

Read More

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी घरचे गावाला गेले असताना व दोघे भाऊ वडिलांच्या घरी जेवणाला गेल्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी एका घरी व दोघा भावांच्या घराचे कुलूप तोडून घरातील २५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ४५ हजार रुपये रोख असा ७० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी, १७ रोजी सकाळी १०-१५ ते ११-३० वाजेदरम्यान तालुक्यातील डामरूण व बोरखेडा खु. येथील गुलाब महादु पाटील यांच्या घरी चोरीची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, योगेश पांडुरंग पाटील (वय ४२, रा. डामरुण, ता. चाळीसगाव) यांच्या घरचे गावाला गेले होते, ते आणि त्यांचे भाऊ…

Read More

साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथील आर.टी.लेले हायस्कुलमध्ये तब्बल २५ वर्षानंतर १९९८ -९९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. या कृतज्ञतेने गुरुजनांना अक्षरशः भारावून आले, बोलताना त्यांचा कंठ दाटून आला. पहूर गु्रप सोसायटी संचलित आर.टी.लेले हायस्कूलच्या १९९८ – ९९ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन रौप्य महोत्सवी कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक वाय. एस. पाटील होते. याप्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक एस. एस. गावंडे, व्ही. एन. पाटील, सी. टी. पाटील, आर. बी. पाटील, विजय बोरसे यांनी मार्गदर्शन केले. एस. एस. गावंडे यांना तर विद्यार्थ्यांशी बोलताना गहिवरून आले. यावेळी निवृत्त मुख्याध्यापक…

Read More

साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील वढवे, चिखली, बेलसवाडी, पिंपरी नांदू अशा चार ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका तसेच तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक, राजुरा, निमखेडी खुर्द या तीन ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका नुकत्याच झाल्या आहेत. निवडणूक लढविलेल्या तसेच बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसाठी ग्रामपंचायत निवडणुकीचा सार्वत्रिक तसेच पोटनिवडणुकीचा खर्च सादर करण्यासाठी मुक्ताईनगर तहसील कार्यालयात मंगळवारी, २१ नोव्हेंबर रोजी कॅम्पचे आयोजन केले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या संदर्भिय पत्रान्वये, सद्यस्थितीत ग्रामपंचायत सार्वत्रिक, पोटनिवडणुकीचे कामकाज पूर्ण झालेले आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने (बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांसहित) निवडणुकीचे निकाल घोषित केल्याच्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत विहित पध्दतीने निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे आवश्‍यक आहे. खर्च सादर करण्यासाठी संबंधित उमेदवारांनी टु वोटर ॲपचा…

Read More