अमळनेरात रविवारी वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याचे भव्य डिजिटल स्क्रीनवर थेट प्रक्षेपण

0
11

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

भारतात सुरू असलेल्या वर्ल्ड कप क्रिकेटचा अंतिम सामना रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. अंतिम सामन्याचे भव्य डिजिटल स्क्रीनवर थेट प्रक्षेपण जि. प.विश्रामगृह, अमळनेर येथे दाखविण्यात येणार आहे. अमळनेर येथील डॉक्टरांचे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए, अमळनेर), क्रिकेट शौकिनांचा ग्रीन अमळनेर ग्रुप आणि अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजन केले आहे.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अतिशय फार्मात असलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचल्याने संपूर्ण भारतात अंतिम सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भारताचा सामना ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे. हा सामना अमळनेरकरांना सामूहिकरित्या पाहण्याचा आनंद देण्यासाठी आयोजन केले आहे. रविवारी, १९ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रक्षेपणास सुरूवात होणार आहे. क्रिकेट प्रेमींनी त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here