साईमत, बोदवड : प्रतिनिधी येथील न.ह.रांका हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात १० ते २३ नोव्हेंबर दरम्यान हिवाळी क्रीडा शिबिराचे आयोजन केले होते.शिबिरात १२५ मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. शिबिराच्या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी बोदवड संस्थेचे अध्यक्ष मिठुलाल अग्रवाल होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मयूर कळसे, ए.पी.आय. अंकुश जाधव, बोदवड संस्थेचे सचिव विकास कोटेचा, संचालक अशोक जोगड, रमेश जैन, रवींद्र माटे, शाळेचे मुख्याध्यापक पी.एम.पाटील, उपप्राचार्य मीनाक्षी नेमाडे, पर्यवेक्षक आर.के.तायडे, जे.एन. माळी, क्रीडाप्रमुख डॉ.संजय निकम, एस.विनोद आंबुसकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिबिरामधील तीन खेळाडूंमधून पाचवीतील पंखुडी बडगुजर, सातवीतील प्रज्ञा भंगाळे, सातवीतील उदय शेळके…
Author: Sharad Bhalerao
साईमत, मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे एकाला तांबे विक्रीचे आमिष दाखवून त्याच्याकडून ३० हजार रुपये बळजबरीने हिसकावल्याची घटना घडली. याप्रकरणी कुऱ्हा काकोडा येथील चौघांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. काही तासातच चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, यातील संशयित आरोपींकडून ५ हजार रुपयाची रक्कम हस्तगत केली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना तात्काळ अटक केल्याने यशस्वी कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत आहे. सविस्तर असे की, जम्मू कश्मीर राज्यातील पुलवामा येथील सीदान मोहल्ला रत्नापुरा येथील सईद नूर मोहम्मद अदराबी (वय ४५) यांना कुऱ्हा काकोडा येथील चौघांनी यूट्यूबच्या माध्यमातून तांबे कमी भावात विक्री करण्यासंदर्भात…
साईमत, अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक बाजार समिती कार्यालयात नुकतीच घेण्यात आली. मुंबई येथे होणाऱ्या संघटनेच्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस पाटील जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला. तसेच प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. येत्या मंगळवारी, २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान राज्यातील पोलीस पाटील बांधवांच्या विविध मागण्यांसाठी म.रा.गां.का.पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण व धरणे आंदोलन होणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पोलीस पाटील यांची सहविचार सभा आयोजित केली होती. यावेळी गणेश भामरे, प्रतिभा देसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सेवानिवृत्त पोलीस पाटील भानुदास पाटील, तालुकाध्यक्ष…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील ११ हजार ३६० केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांची विमा नुकसान भरपाई मिळण्याच्या आशा मावळल्या होत्या. याबाबत विमा कंपनीने नुकसान भरपाईबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवला असल्याने खा.उन्मेश पाटील यांनी अभ्यासपूर्ण माहिती सादर करून शेतकऱ्यांनी भरलेला पिक विमा हप्ता शासनास जमा करु नये व लागवड केलेले क्षेत्र अंतिम ग्राह्य धरून पिक विमा नुकसान भरपाई अदा करण्याची मागणी करून त्यास मंजूरी मिळवून घेतल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार असून प्रलंबित पिक विमा मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी पिकाचा अंबिया…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुलाचे वास्तूरचनाकार व प्रकल्प सल्लागार (आर्किटेक्चर) म्हणून मुंबईचे शशी प्रभू आणि असोसिएट्स यांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीने गुरुवारी, २३ रोजी नाव निश्चित केले. लवकरच त्यांना कार्यारंभ आदेश दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील नावलौकिकात भर टाकणारे विभागीय क्रीडा संकुलाची डिझाईन साकारतांना जिल्ह्यातील स्थानिक खेळांना प्रोत्साहन व उत्तेजन मिळेल. अशा क्रीडा सुविधांना प्राधान्य देण्यात यावे. यासाठी स्थानिक उद्योजक, क्रीडा प्रेमी व संघटनांच्या सूचनांचा विचार करण्यात यावा. अशा सूचना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मेहरूण येथे प्रस्तावित विभागीय क्रीडा संकुल,…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्थसंकल्पातून आ.सुरेश दामु भोळे यांच्या प्रयत्नातून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यापैकी काव्यरत्नावली चौक ते टॉवर चौक रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. यावेळी अधिकाऱ्यांसह आमदार भोळे यांनी पाहणी करीत उत्तम प्रकारे काम करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी नारळ वाढवून कार्याला सुरुवात झाली. शहराचा दुरोगामी विकास लक्षात घेता शहरात व्हाईट टॉपिंग पद्धतीचे काँक्रीटचे उत्तम दर्जाचे रस्ते झाले पाहिजे, असा मानस ठेऊनच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांसोबतच विविध प्रभागातील कॉलनी एरियामधील रस्त्यांची कामे सुद्धा नियोजनात्मक पद्धतीने करण्यात येत आहेत. दरम्यान, अर्थसंकल्पातील ८५ कोटींच्या निधीतून मुख्य रस्त्यांची कामे व त्यासोबतच…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव नगरीचे ग्रामदैवत आणि वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेले श्रीराम मंदिर संस्थान (रामपेठ) जळगावच्या विद्यमाने कार्तिकी प्रबोधनी एकादशीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही भव्य श्रीराम रथयात्रेचे गुरुवारी, २३ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात राम नामाच्या गजरात आयोजन केले होते. यानिमित्त पहाटे चार वाजता काकड आरती, प्रभू श्रीरामांच्या उत्सव मूर्तीस महाभिषेक, सकाळी सात वाजता महाआरती, सकाळी साडेसात ते साडेआठ सांप्रदायिक परंपरेचे भजन त्यानंतर मंदिराच्या प्रांगणात सकाळी साडेदहा वाजता श्रीराम रथाचे महापूजन वंशपरंपरेने श्रीराम मंदिर संस्थांचे प्रमुख विश्वस्त, विद्यमान पंचम गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज जोशी (श्री अप्पा महाराजांचे पाचवे वंशज) यांच्या हस्ते व शहरातील समस्त ब्रह्मवृंद मंडळी यांच्या वेद मंत्र घोषात झाले.…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी साहित्य संस्कृती मंच मध्यप्रदेश यांच्यावतीने मराठी साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात काम केलेल्या मान्यवरांना विविध पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्यात जळगावचे रंगकर्मी शंभू पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार त्यांच्या नाट्य क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल देण्यात येणार आहे. यासोबतच डॉ. उमा कंपुवाले यांना कवयित्री डॉ. सुशीलाबेन शहा हा पुरस्कार देण्यात येणार आहे. इंदोरचे अनिल धडाईवाले यांना सोपानदेव चौधरी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तर अश्विन खरे यांना पूज्य साने गुरुजी पुरस्कार तर सातारा येथील शिरीष चिटणीस यांना कवी भा. रा. तांबे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शनिवारी, २५ रोजी उद्घाटन समारंभात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. साहित्य संस्कृती मंच…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी जळगाव येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळासाठी (ईएसआयसी) रूग्णालयासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एमआयडीसी क्षेत्रात अवघा १ रूपया चौरस मीटरमध्ये जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रूग्णालयांच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. जळगाव शहर व जिल्ह्यातील कामगारांसाठी सर्व सोयी-सुविधांनी युक्त शासकीय रूग्णालय असावे, अशी जिल्ह्यातील कामगारांची अनेक दिवसांपासून मागणी होती. यासाठी खा.उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून कामगारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना रूग्णालयासाठी जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. यासाठी आ.सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व प्रांताधिकारी महेश सुधळकर…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा मोहीम १५ नोव्हेंबर, २०२३ ते २६ जानेवारी, २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात जाऊन केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रसिद्धी करणाऱ्या फिरत्या एलईडी वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालयातून ग्रामविकास तथा पंचायतराज मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी खा. रक्षा खडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील आदी उपस्थित होते. मोहिमेच्या माध्यमातून भारत सरकारच्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात यावा. योजनांची व्यापक स्वरुपात जनजागृती करत जिल्ह्यात…