बोदवडच्या न.ह.रांका हायस्कुलला हिवाळी क्रीडा शिबिराचा निरोप समारंभ

0
6

साईमत, बोदवड : प्रतिनिधी

येथील न.ह.रांका हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात १० ते २३ नोव्हेंबर दरम्यान हिवाळी क्रीडा शिबिराचे आयोजन केले होते.शिबिरात १२५ मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. शिबिराच्या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी बोदवड संस्थेचे अध्यक्ष मिठुलाल अग्रवाल होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मयूर कळसे, ए.पी.आय. अंकुश जाधव, बोदवड संस्थेचे सचिव विकास कोटेचा, संचालक अशोक जोगड, रमेश जैन, रवींद्र माटे, शाळेचे मुख्याध्यापक पी.एम.पाटील, उपप्राचार्य मीनाक्षी नेमाडे, पर्यवेक्षक आर.के.तायडे, जे.एन. माळी, क्रीडाप्रमुख डॉ.संजय निकम, एस.विनोद आंबुसकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिबिरामधील तीन खेळाडूंमधून पाचवीतील पंखुडी बडगुजर, सातवीतील प्रज्ञा भंगाळे, सातवीतील उदय शेळके तर मान्यवरांमध्ये तहसीलदार मयूर कळसे, ए.पी.आय. अंकुश जाधव, बोदवड संस्थेचे अध्यक्ष मिठुलाल अग्रवाल, सचिव विकास कोटेचा यांनीही मनोगत व्यक्त केले.

शिबिरात खेळाडूंना मार्गदर्शन करणारे सीनियर खेळाडू भूषण भोई, प्रेम वंजारी, राम शर्मा, आनंद माळी यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्या ११० खेळाडूंना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शिबिरात विविध खेळांविषयी मार्गदर्शनासह उपक्रम राबविण्यात आले. शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी जिल्ह्यातील विविध क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शकांना बोलाविण्यात आले होते. बक्षीस वाचन के.डी.मिस्तरी यांनी केले.

यशस्वीतेसाठी क्रीडा विभाग प्रमुख डॉ.संजय निकम, आर.के.तायडे, एन.यु.बागुल, आर.एस.जैस्वाल, एस.ए.तायडे, एस.के.राणे, भूषण भोई, गंगाराम गंगतीरे, विनोद जैन, प्रेम वंजारी, सुमित मोपारी, अंकित बोरसे, शिवा मिस्त्री, दीपक माळी, विजय चोपडे, मुरली मिस्तरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पी.एम.पाटील, सूत्रसंचालन निशान महाजन तर आभार आर.के.तायडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here