अमळनेर तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक

0
14

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक बाजार समिती कार्यालयात नुकतीच घेण्यात आली. मुंबई येथे होणाऱ्या संघटनेच्या उपोषणाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त पोलीस पाटील जाणार असल्याचा निर्धार करण्यात आला. तसेच प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

येत्या मंगळवारी, २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान राज्यातील पोलीस पाटील बांधवांच्या विविध मागण्यांसाठी म.रा.गां.का.पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण व धरणे आंदोलन होणार आहे. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील पोलीस पाटील यांची सहविचार सभा आयोजित केली होती. यावेळी गणेश भामरे, प्रतिभा देसले यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सेवानिवृत्त पोलीस पाटील भानुदास पाटील, तालुकाध्यक्ष गोविंद शिंदे, राज्य सदस्य भागवत पाटील, डॉ.दत्ता ठाकरे, संजय पाटील, रवींद्र पाटील, अंकुश पाटील, प्रदीप चव्हाण, रामचंद्र चौधरी, सुभाष पाटील, गोविंदा पाटील, पंजाबराव वाडीले, गजेंद्र पाटील, अल्का पाटील, महेंद्र पाटील, विनोद बोरसे आदी उपस्थित होते. बैठकीचे नियोजन जिल्हा सचिव लखीचंद पाटील यांनी केले. सूत्रसंचालन तथा आभार डॉ.दत्ता ठाकरे यांनी मानले.

राज्यातील पोलीस पाटील यांच्या काही प्रमुख मागण्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्या मान्य होण्यासाठी म.रा.गां. का. पोलीस पाटील संघातर्फे मंत्रालयात बैठका, निवेदने, भेटीसाठी पत्रव्यवहारासह लोकशाही मार्गाने पाठपुरावा करीत आहेत. परंतू अद्यापपर्यंत शासनाने त्यावर योग्य निर्णय घेतला नसल्याने संघटनेने उपोषणाचा मार्ग निवडला आहे. मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक मारवड यांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here