साईमत, जामनेर : प्रतिनिधी येथील वाकी रस्त्यालगतचे रहिवासी तथा शासकीय आश्रमशाळा जोंधनखेडा येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक डिगंबर दगडू पाटील (डी.डी. पाटील) यांना नुकतेच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.डी. पाटील त्यांच्या पत्नी सुनंदा पाटील यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी एस.पी.तडवी, जी.आर.कोळी, के. पी. ठाकरे, डी. टी. पाटील, श्रीमती येवले, आर. एस. उगले, गुलाब तडवी, सचिन तडवी, मंगतार पवार, गणेश पवार, मेहमूद तडवी यांच्यासह शिक्षक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. डी.डी. पाटील यांनी आपल्या २७ वर्षाच्या सेवेमध्ये मुख्याध्यापक म्हणून शासकीय माध्यमिक आश्रमशाळा लाल माती, रावेर, जोंधणखेडा, बंधारे ता.नवापूर व आंबे अशा विविध ठिकाणी आदर्श शिक्षक म्हणून…
Author: Sharad Bhalerao
साईमत, बोदवड : प्रतिनिधी भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे, सर्व श्रेष्ठ असे संविधान आहे. परंतु अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ व अनेक रूढी-परंपरा या सर्वांना न्याय देणारे व सर्व समाज घटकांना विकासाच्या प्रवाहात आणणारे संविधान आहे. त्यात वेळ, काळानुरूप दुरुस्ती करण्याची तरतूद आहे. त्यामुळे संविधान हे नेहमी नव्या युगाचे नायक आहे. आज देशातील सर्व कायद्याचे व भविष्यात होणाऱ्या सर्व कायद्याचे संविधान उगमस्थान असल्याचे प्रतिपादन तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी केले. संविधान दिनानिमित्त बोदवड येथील न्यायालयात आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व घटना निर्मिती विषयावर ॲड. धनराज प्रजापती यांनी विचार मांडले. तसेच…
साईमत, बोदवड : प्रतिनिधी तालुक्यातील जामठी येथील श्रीमती चि. स. महाजन माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक के. आर. पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६२ वे राज्यस्तरीय अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या फैजपूर नगरीत जे.टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेज याठिकाणी १८ व १९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. जळगाव जिल्ह्यातून जामठी माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाचे मुख्याध्यापक के. आर. पाटील यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार त्यांना कार्यक्रमात महामंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब जे. के. पाटील,…
साईमत, पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील खडकदेवळा हायस्कूलचे उपशिक्षक चंद्रकांत बाजीराव पाटील यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. सावंतवाडी-कोकण, जि.सिंधुदुर्ग येथील नगरपालिका नाट्यगृहात झालेल्या विशेष समारंभात माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते चंद्रकांत पाटील यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्रासह मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे, जिल्हा सचिव प्रवीण मोरे, गजेंद्र कानडे (दोंडाईचा), कुंदा पाटील, कृष्णराव पाटील, भावेश अहिरराव, राजेंद्र पाटील, स्वप्निल बागुल,…
साईमत, जामनेर : प्रतिनिधी तालुक्यात अनेक नवीन विकास कामे मंजूर झाली आहेत. त्या नवीन विकास कामांमध्ये तळेगाव येथील वंजारी समाज मंगल कार्यालयाचे भूमिपूजन जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. मंत्री गिरीष महाजन यांच्या निधीतून तळेगावातील वंजारी समाज बांधवांना समाज मंदिर मंगल कार्यालय उपलब्ध व्हावे, म्हणून त्यांच्या प्रयत्नातून मंगल कार्यालय मंजूर करण्यात आले. त्याचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक छगन झाल्टे, माजी सरपंच राजेश लोढा, पं.स.चे माजी उपसभापती नवलसिंग राजपूत, प्रशांत वाघ, ज्ञानेश्वर उबाळे, विजय पाटील, महारु नाईक, प्रल्हाद सानप, जगन्नाथ नाईक, नंदु पाटील यांच्यासह समाजबांधव, ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.
साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर येथील ग्रामपंचायत आणि श्रीराम मंदिर जवळील रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायत आणि मंदिरासमोरील रस्ता जणू कचरा स्टोरेज झाला आहे की काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिसरात कचराकुंडी नसल्यामुळे परिसरातील जनता रस्त्यावरील जागेत कचरा टाकतात. ग्रामपंचायत समोरील गटारी तुडुंब भरलेल्या असतात. रस्त्यावरून सरकारी दवाखाना, मराठी मुलींची शाळा, माध्यमिक विद्यालय, पोलीस दुरुक्षेत्र असल्याने रस्ता नेहमी रहदारीचा असतो. परंतु आता रस्त्याने आपण पायी सुद्धा जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती पाण्यामुळे निर्माण झाली आहे. पाणी नसल्यावरही याठिकाणी नेहमीच घाणीचे साम्राज्य असते. ते पार केल्यानंतरच पुढील कामाची दिशा मिळते. याठिकाणी मोकाट डुकरे,…
साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील हे महाराष्ट्रभर मराठा समाजाशी सभेतून संवाद साधत आहेत. त्याच अनुषंगाने दुसऱ्या टप्प्यातील जरांगे-पाटील यांच्या दौऱ्यास सुरुवात होणार आहे. चाळीसगाव शहरातील नारायणदास अग्रवाल क्रीडा संकुल मोठ्या कॉलेजचे ट्रॅक ग्राउंड, करगाव रोड येथे मनोज जरांगे-पाटील यांची रविवारी, ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता विराट सभा होणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्यावतीने शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. विराट सभेला चाळीसगाव शहरासह तालुक्यातील तसेच भडगाव , पाचोरा, पारोळा, नांदगाव, कन्नड, येवला तालुक्यासह परिसरातील मराठा बांधव, भगिनी मराठा समाजाच्या…
साईमत, पाळधी, ता.धरणगाव : वार्ताहर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे अचानक थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे पाळधी परिसरातील गरजू, निराधार, अनाथ नागरिकांना पाळधी येथील जीपीएस मित्र परिवारातर्फे ना.गुलाबराव पाटील यांच्या सुचनेवरुन आणि जि.प.चे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जोपासत थंडीत मायेची ऊब देण्यासाठी जीपीएस परिवारातर्फे प्रत्येकी एक किटचे नुकतेच वाटप करण्यात आले. त्यात ब्लँकेट, चादर व जॅकेटचे वाटप करण्यात आले. साहित्य वाटप करीत असताना अनेक निराधार लोकांना अश्रू अनावर झाले होते. अश्या सामाजिक उपक्रमाचे पाळधी परिसरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह संपूर्ण जीपीएस मित्र परिवार उपस्थित होते.
साईमत, मलकापूर : प्रतिनिधी तालुक्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेना उबाठाच्यावतीने बुधवारी, २९ नोव्हेंबर रोजी तहसीलदार राजेश सुरळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, गेल्या दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या कपाशी, तूर, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शिवसेना (उ.बा.ठा) पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार राजेश सुरळकर यांच्याकडे केली आहे. शिवसेनेच्या रास्त मागणीची दखल घेत तात्काळ तिन्ही मंडळातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांना पंचनामे करण्याचे आदेशित केल्याचे तहसीलदार राजेश सुरळकर यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.…
साईमत, वरणगाव : प्रतिनिधी शहरासह परिसरातील गुंडागर्दी व टवाळखोरी मोडीत काढणार आहे. सर्वसामान्य नागरिकांवर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे वरणगाव पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांनी सांगितले. वरणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांची महिनाभरापासून बदली होणार असल्याची चर्चा सुरू असतानांच रावेर येथे बदली झाल्याचे आदेश मंगळवारी रात्री अचानक प्राप्त झाले. त्यामुळे त्यांच्या जागेवर जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती होताच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशान्वये त्यांनी बुधवारी सकाळीच सहायक पोलीस निरीक्षक आडसुळ यांच्याकडून पदभार स्वीकारला. सपोनि भरत चौधरी…