तळेगावला वंजारी समाज मंगल कार्यालयाचे भूमिपूजन

0
3

साईमत, जामनेर : प्रतिनिधी

तालुक्यात अनेक नवीन विकास कामे मंजूर झाली आहेत. त्या नवीन विकास कामांमध्ये तळेगाव येथील वंजारी समाज मंगल कार्यालयाचे भूमिपूजन जामनेरच्या माजी नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. मंत्री गिरीष महाजन यांच्या निधीतून तळेगावातील वंजारी समाज बांधवांना समाज मंदिर मंगल कार्यालय उपलब्ध व्हावे, म्हणून त्यांच्या प्रयत्नातून मंगल कार्यालय मंजूर करण्यात आले. त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक छगन झाल्टे, माजी सरपंच राजेश लोढा, पं.स.चे माजी उपसभापती नवलसिंग राजपूत, प्रशांत वाघ, ज्ञानेश्‍वर उबाळे, विजय पाटील, महारु नाईक, प्रल्हाद सानप, जगन्नाथ नाईक, नंदु पाटील यांच्यासह समाजबांधव, ग्रामस्थ, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here